Type Here to Get Search Results !

मेलाणे तालुक्यात चोपडा गावात गांजाची शेतीची मोठी कार्यवाही 44 लाखाचा ९८० किलो गांजा जप्त

मुख्य संपादक:- संदीप पाटील 0

 चोपडा तालुक्यात मेलाणे गावात गांजाची शेतीची मोठी कार्यवाही 44 लाखाचा  ९८० किलो  गांजा जप्त




पोलीसरा मिडिया :- संदिप पाटील (दि.13 मार्च 2024)

चोपडा तालुक्यातील मेलाणे गावात मक्याच्या शेतामध्ये कांद्याची पेरणी केली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात  ४४लाख १० हजार रुपयाचे  ९८० किलो गांजाची हिरवे ओले झाडे  जप्त  केली. आरोपी अर्जुन सुमाऱ्या पावरा वय ४५ रा. मेलाणे ता. चोपडा यास ताब्यात घेवून गुन्हयांत अटक केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 12रोजी पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील ज्यांना गुप्त माहिती मिळाली की चोपडा तालुक्यातील मेलाणे गावात राहणारा अर्जुन सुमान्ऱ्या पावरा हा त्यास शासना कडून उपजिविकेसाठी मिळालेली नवाड शेत जमीनीत मका पिकात कॅनाबिस वनस्पती (गांजा) या अंमली पदार्थाच्या वनस्पतीची लागवड केली. याची खात्री करण्यासाठी दोन स्थानिक गुन्हे शाब्दिक कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवण्यात आले खात्री झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वरी यांना माहिती देण्यात आली त्यांनी केलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा डॉ.  कृणाल सोनवणे,
पोलीस निरीक्षक, चोपडा ग्रामीण कावेरी कमलाकर,  वनविभागाचे अधिकारी  कमल ठेकले, नायब तलसिलदार . रविंद्र महाजन, फोटोग्राफर, वजनकाटा धारक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे  अमोल मोरे, सहा. पोलीस निरीक्षक, सफो/युनूस शेख, पोहेकॉ सुनिल दामोदरे, संदिप पाटील, गोरख बागुल, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, दर्शन ढाकणे, अशोक पाटील, बबन पाटील, मपोहेकॉ रजनी माळी, मपोना उपाली खरे या पथकाने मेलाणे  गावात आरोपी अर्जुन सुमाऱ्या पावरा याचे नवाड शेतात
जावून मका पिकात लावलेला गांजाचे झाडे  झाडे उपटून त्याचे वजन केले असता ९८० किलो  ४४लाख १० हजार रुपयाची  गांजाची हिरवे ओले झाडे जप्त केली.आरोपी अर्जुन सुमाऱ्या पावरा वय ४५ रा. मेलाणे ता. चोपडा यास ताब्यात घेवून गुन्हयांत अटक केली आहे. सदर बाबत चोपडा ग्रामीण पो.स्टे.ला CCTNS नं.४०/२०२४ NDPS कायदा १९८५ चे कलम २०,२२ प्रमाणे गुन्हा दाखल केला. पुढील तपास .सहा. पोलीस निरीक्षक, नितनवरे,   हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

News Blogger Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable