Type Here to Get Search Results !

चोपडा चाळीसगाव पोलिसांची कामगिरी तेरा गावठी कट्टर सह पाच आरोपी अटकेत या प्रकरणात हॅण्डलर अटकेमध्ये

मुख्य संपादक:- संदीप पाटील 0

 चोपडा चाळीसगाव पोलिसांची कामगिरी तेरा गावठी कट्टर सह पाच आरोपी अटकेत या प्रकरणात हॅण्डलर अटकेमध्ये


तर पंजाबचे कनेक्शन
पुणे येथिल खुनासह मोक्का मधील फरारी अटकेत पा

जळगांव पोलीसराज मिडिया

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलिसांच्या मध्ये नाकाबंदीचे आदेश देण्यात आलेले आहे. नाकाबंदी सुरू असताना  चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तर चोपडा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईमध्ये 13 गावठी कट्टे,30 काडतूस,6 मॅक्झिन,5 मोबाईल 2 मोटरसायकल असा एकूण 6 लाखाचा मुद्देमाल जप्त व 5 आरोपी अटक  करण्यात आले आहे . परंतु जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई पोलीस दलाची आहे जिल्हा पोलीस अधीक्षक  महेश्वर रेड्डी यांनी दोन्ही कर्मचारी बक्षीस दिले.

जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलाने एका दिवसात चाळीसगाव चोपडा ग्रामीण या ठिकाणी तेरा गावठी पिस्तूल 30 कारतूस सहा मॅक्झिन व पाच आरोपींना अटक केलेली आहेत यात समर्थ पोलीस ठाणे, पुणे येथिल खुनासह मोक्का अधिनियम या गुन्हयात फरारी असलेल्या आरोपीस ४ गावठी पिस्टलसह चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन येथे अटक केली आहे.
याबाबत पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक एम सी व्ही महेश्वर रेडी यांनी माहिती दिली की, .१० रोजी चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन हददीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे रोड, तेजस कोनार्ककडे जाणारे रोडवर नाकाबंदी लावण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान धुळयाकडून मोटार सायकल क्रमांक एम एच 12 व्हि एक्स ३००८ हिचेवरुन चाळीसगावचे दिशेने दोन इसम येत होते. नाकाबंदी सुरु असलेली पाहून काही अतंरावर मोटार सायकल थांबून मागे बसलेला इसम गाडी उतरून धुळ्या रोडने पळून गेला
त्यामुळे पोलीसानी l मोटार सायकल चालवित असलेल्या व्यक्तीला मोटार सायकलीसह ताब्यात घेतले.  आमीर आसीर खान, वय २०, रा.काकडे वस्ती, कोढंचा, पुणे व पळून गेलेला
  आदित्य भोईनल्लू, रा.पुणे असे सांगितले.
आमीर आसीर खान याचेकडील सॅक (बॅग) तपासली असता त्यामध्ये गावठी बनावटीचे ४ पिस्टल, ५ मॅगझ ीिन व १० जिवंत काडतुस, एक मोटार सायकल असा एकुण २,०५,०००/- रु. किंमतीचा शस्त्रसाठा व मुददेमाल मिळून आला आहे. या दोन्ही आरोपींचे विरुध्द चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा  पोकों ३३६३ पवन पाटील यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*******  गुन्हयातील मिळून आलेला आरोपी आमीर आसीर खान याचेकडे केलेल्या तपासात तो शरीराविरुध्द गंभीर गुन्हे करणारा सराईत, तडीपार असलेला गुन्हेगार असुन समर्थ पोलीस स्टेशन गुरनं. २१८/२०२३ भादवि कलम ३०२, ३०७ सह सघंटीत गुन्हेगारी अधिनियम प्रमाणे दाखल गुन्हयात मागील ६ महिन्यापासुन फरार आहे. त्याचेवर एकूण ६ गंभीर गुन्हे दाखल असुन त्याला पुणे जिल्हयातुन दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आलेला आहे. नमुद आरोपीचा साथीदार आदित्य भोईनल्लू, रा. पुणे हा फरार असुन त्याचा देखील शोध सुरु आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक . संदिप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि .सागर एस. ढिकले पोउपनिरीक्षक . सुहास आव्हाड, योगेश माळी, पोहेकॉ  राहुल सोनवणे, पोना  महेंद्र पाटील, पोकों  पवन पाटील, पोकॉ  मनोज चव्हाण, पोकों  आशुतोष सोनवणे, पोकों  रविंद्र बच्छे, पोकॉ  ज्ञानेश्वर गीते, पोकों  ज्ञानेश्वर पाटोळे, पोकॉ  नंदकिशोर महाजन, पोकॉ  समाधान पाटील या पथकाने सदरची कारवाई केली आहे.
तर
१० रोजी पार उमटी येथील शिकलकर समाजाचे दोन इसम हे अवैध अग्नीशस्त्राची विक्री करणार असून हा सौदा हा चोपडा तालुक्यातील कृष्णापुर  शिवारातील  उमटी रोडवरील घाटात होणार असलेबाबत माहीती मिळाली होती. त्याप्रमाणे कृष्णापुर ते उमटी जाणारा डोंगराळ भागातील कच्चा रस्त्यावरील घाटातील मंदीरापासून थोडे पुढे उमटों गावाकडेस चढ़ती जवळ सदर दोन मोटार सायकलीवरील ४ इसमांकडे काहीतरी संशयीत गोण्या मध्ये असल्याचे संशय आल्याने त्यांचेवर छापा टाकून त्यांना जागीच पकडले चौकशी केली असता हरजनसिंग प्रकाशसिग चावला वय २० वर्ष, रा. पारउमटी, ता. बरला, जि. बडवाणी, (म.प्र), मनमीतरिरंग धृवासिग बनर्नाला वय २० वर्षे, रा. पारउमटी, ता. वरला, जिल्हा बडवाणी (म.प्र), अलबास दाऊद पिजारी वय २७ वर्षे,रा महादेव चोक बाजार पेठ हरिविठ्ठल नगर, जळगांव ता. जि. जळगांव  अर्जुन तिलकराज मलीक वय २५ वर्षे, रा. एकता नगर, चमरंग रोड अमृतसर, राज्य पंजाब यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेता त्यांचे कडील गोणीमध्ये ९ गावठी कट्टे, २० जिवंत काडतुस, व २ रिकाम्या मॅग्झिन असा मुद्देमाल मिळून आला . चारही इसमांनी पोलीसांचे तावडीतुन सुटुन पळून जाण्यासाठी हुज्जत घालून पोलीस कर्मचान्यांशी हातापायी करुन शिवीगाळ व धक्का बुक्की केली . त्यांच्या
ताब्यातील  ९ गावठी कट्टे, २० जिवंत काडतुस, व. २ रिकाम्या मेग्झिन, ४ मोबाईल हेण्डसेट व २ मोटार सायकलोसह असे मिळून आले, असा एकूण ४,०७,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल
मिळून आला आहे. सदरचे गावठी कट्टे मिळून आल्याने पोहेको ३०९४ शशीकांत हिरालाल पारधी  चोपडा प्रामीण पो स्टे यांनी फिर्याद दिल्यावरून चोपडा प्रामीण पोलीस स्टेशन गुन्हा नोद करण्यात आला आहे.सदरची कारवाई  पो.नि.कावेरी कमलाकर, पोहेको  शशीकांत पारधी, पोहेको  किरण पाटील, पोको  गजानन पाटील, पोकी/ संदिप निळे, होमगार्ड थावा बारेला, होमगार्ड  सुनिल धनगर, होमगार्ड/ श्रावण तेली, होम/ संदिप सोनवणे सर्व नेमणुक चोपडा ग्रामीण पां. स्टे यांनी केली आहे

*** अलबास दाऊद पिंजारी वय २७ वर्षे, रा. महादेव चौक बाजार पेठ हरिविठ्ठल नगर जळगांव ता. जि जळगांव हा रेकॉर्डवरोल गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर राज्यात एकूण ९ ते १० गुन्हें दाखल आहेत.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

News Blogger Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable