८८४० वृक्षांची लागवड व संवर्धन; पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम..
जून ०५, २०२४
0
ख८८४० वृक्षांची लागवड व संवर्धन; पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम..
चोपडा प्रतिनिधी:- संदिप पाटील
दरवर्षी पावसाळा आला की झाडे लावा ची आरोळी सुरू होते. आणि पावसाळा संपताच त्यातील हवा निघून जाते. तेच खड्डे, तेच लोक पण नवीन झाडे अशा साखळीतून लाखो रुपये खड्डयात जातात. पण झाडांचे संगोपन होत नाही. मात्र, तब्बल ८८४० वृक्ष लागवड करून वनराई फुलवण्याची किमया पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेने करून दाखवली आहे.
तब्बल ८८४० खड्डयांमध्ये वड, पिंपळ, कडुलिंब, करंज, आवळा, कवठ, आंबा तसेच विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थे मार्फत विविध गटात व शालेय परिसरात करण्यात आली आहे...
समृद्ध व आनंदी जीवनासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक असून तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले यांनी वृक्ष लागवड कार्यक्रम प्रसंगी केले.
ते म्हणाले, ‘‘समृद्ध व आनंदी जीवनासाठी पर्यावरण रक्षण काळाची गरज आहे. वाढत्या औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. झाडे हवेतील कार्बनडायऑक्साइड शोषून शुद्ध ऑक्सिजन निर्माण करतात.
पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासत आडगाव व साळवा ही गावे दत्तक घेऊन त्या गावात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून एक वेगळा विक्रम केला. तसेच जलसंधारण, वृक्ष संवर्धन आणि मृद संधारण, पाणलोट क्षेत्र विकासात पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेने आतापर्यंत भरीव कार्य केले आहे. त्यासोबत व्यसनाधीनता निर्मूलन, गरीब व होतकरूंसाठी मोफत शिक्षण, अध्यात्मिक जडणघडण, महिला सबलीकरण, रक्तदान शिबिरे ,आरोग्य शिबिरे ,गॅस व निर्धुर चूल वाटप ,दसरा - दिवाळी निमित्त कपडे व वस्तूंचे वाटप, विविध अभ्यास दौऱ्यांचे आयोजन असे विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे....
Tags

