मुस्तफा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी असगर अली तर उपाध्यक्षपदी लियाकत अली यांची निवड

Advertisement

मुस्तफा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी असगर अली तर उपाध्यक्षपदी लियाकत अली यांची निवड

मुस्तफा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी असगर अली तर उपाध्यक्षपदी लियाकत अली यांची निवड
चोपडा प्रतिनिधी:- संदिप पाटील चोपडा शहरातील मुस्तफा एज्युकेशन सोसायटी च्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमानुसार सन २०२४ ते २०२९ या कालावधी करिता कार्यकारी मंडळाची निवड जाहीर करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी असगर अली महेबूब अली तर उपाध्यक्षपदी लियाकत अली सय्यद नूर निवडून आले. तर आरिफ अहेमद हाजी अब्दुल सत्तार सचिव पदी, मोहम्मद हारून हाजी मोहम्मद इब्राहिम यांची सहसचिव पदी निवड करण्यात आली, तसेच जुनेद अहेमद सैय्यद लियाकत अली खजिनदार तर फिरोज खान हाजी मेहबूब खान, अरमान अली असगर अली, शेख मुख्तार शेख युसुफ, फारुक खान हाजी मेहबूब खान, शेख शरीफ हाजी अब्दुल सत्तार यांची कार्यकारणी सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. नजीर एफ. पिंजारी, जळगाव यांनी पार पाडला व वरील प्रमाणे बिनविरोध कार्यकारणी जाहीर केली. नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाच्या संस्थेचे सर्वसाधारण सभासद, शहरातील विविध मान्यवर तसेच मुस्तफा अँग्लो उर्दू प्रायमरी, हायस्कूल व ज्यू. कॉलेज च्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या