तांदळवाडी परीसरात शांततेत मतदान पार,मतदारांना निकालाची ऊत्सूकता....
नोव्हेंबर २०, २०२४
0
तांदळवाडी परीसरात शांततेत मतदान पार,मतदारांना निकालाची ऊत्सूकता....
पोलीसराज मिडिया :- संदिप पाटील
दि.20/11/2024
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. आता राज्यात कुणाचं सरकार येणार? कोणत्या मतदारसंघातून कोण विजयी होउ शकतं? याचा अंदाज नागरीक बांधत बसतांना दिसत आहेत. मतदानाची वेळ संपली आणी मतदारांची मते पेटीत कैद झाली आहेत,येणा-या 23 तारखेला कोण निवडून येणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
माजी आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशाणीवर निवडणूक लढत आहेत तर प्रभाकर गोटू सोनवणे ही उबाठा कडून मशाल या निशाणीवर निवडणूक लढत आहेत.
तांदळवाडीत सकाळपासूनच जि.प.प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. सकाळपासून आपापल्या पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना काढण्यात व्यस्त होते.नागरीकांनी ऊत्फूर्त प्रतिसाद देत मतदानाचा हक्क बजावला.गावात मतदानाचा टक्का वाढावा म्हणून मतदाता सकाळीच कर्तव्य बजावण्यासाठी निघाले.
तांदळवाडीत 75.37%, दोंदवाडे 66% तर निमगव्हाण येथे 72.20% मतदान संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान झाले.
मतदान केंद्रावर श्री. एम. एस. नेरपागार यांनी केंद्राध्यक्ष म्हणून तर पंकज गुलाबराव पारधी. यांनी केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम पाहीले. तर मनोज सुरेश राजपूत मतदान अधिकारी , संदिप दिपकलाल मंडावर मतदान अधिकारी, श्रीमती.माधुरी वसंत महाजन मतदान अधिकारी,श्रीमती राजश्री किशोर पवार मतदान अधिकारी, निवृत्ती प्रल्हाद पाटील शिपाई, एम. के. शर्मा पोलिस कर्मचारी, रामभाऊ सोनवणे. पोलिस कर्मचारी, समाधान धर्मा धनगर. पोलिस पाटील तांदळवाडी यांनी मतदान केंद्रावर काम पाहीले.
Tags

