पुनम पाटील यांना आंतरराष्ट्रीय फुले प्रेमी समाजरत्न पुरस्कार
चोपडा प्रतिनीधी : आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानाच्या यंदाच्या आंतरराष्ट्रीय फुले प्रेमी समाजरत्न पुरस्कारासाठी शिक्षिका, कवयित्री, लेखिका सौ. पुनम अनिल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. कवी विजय वडवेराव आयोजित आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानात तसेच क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले आणि माय सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वसा घेऊन या चळवळीत कार्य करणाऱ्या हातांना बळ देण्यासाठी, कार्याला गती व प्रोत्साहन मिळावे म्हणून आंतरराष्ट्रीय फुले प्रेमी समाजरत्न पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले.
या पुरस्कारासाठी सौ पुनम अनिल पाटील यांची निवड करण्यात आली. दिनांक २ ते ५ जानेवारी दरम्यान देशात पहिल्यांदाच होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये एस. एम. जोशी
सभागृह, पुणे येथील सोहळ्यात सदर पुरस्कारांचे वितरण होणार आहे. पुनम पाटील ह्या जळगाव येथील अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगाव विद्यालयात शिक्षिका आहेत. या पुरस्कारासाठी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

