Type Here to Get Search Results !

" सहृदय आणि संवेदनशील व्यक्तिमत्व : भैय्यासाहेब पंकज बोरोले "

मुख्य संपादक:- संदीप पाटील 0

 " सहृदय आणि संवेदनशील व्यक्तिमत्व  : भैय्यासाहेब पंकज बोरोले "


चांगले विचार, चांगले संस्कार आणि चांगला सहवास असा त्रिवेणी जीवन मुल्ये माणसाला उदात्ततेकडे घेऊन जातात याची प्रखर अनुभूती म्हणजे पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था तथा पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे  संचालक मा. भैय्यासाहेब पंकज बोरोले यांचा १२ डिसेंबर या दिवशी वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या  कार्याचा गौरव या निमित्ताने लेखाचे प्रयोजन - मा. भैय्यासाहेब पंकज बोरोले एक  आदर्श व संवेदनशील सहृदय व्यक्तिमत्व त्यांच्याबाबत मला कविवर्य दत्ता हलसलीकर यांच्या काव्यपंक्ती आठवतात.-- 

ज्यांची बाग फुलून आली , त्यांनी दोन फुले द्यावीत. 

ज्यांचे सूर जुळून आले , त्यांनी दोन गाणी द्यावीत.

आभाळाएवढी ज्यांची उंची, त्यांनी थोडे खाली यावे,

मातीत ज्यांचे जन्म मळले, त्यांना थोडे उचलून घ्यावे.

  कविवर्यांच्या या काव्यपंक्तीप्रमाणेच मा. भैय्यासाहेब पंकज बोरोले समाजातील आदिवासी उपेक्षित आणि एकूणच सर्व स्तरातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या उन्नतीसाठी अविरत धडपडणारे व्यक्तिमत्व  अश्या तरुण तडफदार मा. भैय्यासाहेब पंकज बोरोले यांचे अनेक गुण समाजाला आणि तरुणाईला दीपस्तंभासारखे प्रेरणा देणारे आहेत.

         मा. भैय्यासाहेब  पंकज बोरोले आपले वडील मा.दादासाहेब डॉ.सुरेश बोरोले यांचा पावलावर पाऊल ठेवत शैक्षणिक, सामाजिक ,सांस्कृतिक, साहित्य ,सहकार आणि राजकीय क्षेत्रात अतिशय भरीव योगदान आणि कार्य करीत आहेत. 'भारत हे एक तरुण राष्ट्र आहे' असे म्हटले जाते. तरुणांचा देश म्हणून आपल्या देशाचे नावलौकिक आहे. याच तरुण शक्तीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात आज आपण प्रगती साधू शकत आहोत ‌. प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्या कार्याची ओळख निर्माण करणारे युवक सामाजिक चर्चेचा विषय होतात. असाच चर्चेतील सन्मुख चेहरा म्हणजे मा. भैय्यासाहेब पंकज सुरेश बोरोले



            सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले चोपडा शहराच्या विकासासाठी पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून मोलाची भर घातली . याबरोबरच पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या रूपाने समाज  व शिक्षण बदलाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले. पंकज बाल संस्कार केंद्राच्या रूपाने सुरू झालेल्या शिक्षण गंगोत्रीचा विस्तार प्राथमिक ,माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालया पर्यंत पोहोचलेला फक्त विद्याशाखांचा विस्तार झाला नाही तर  गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे शिक्षणाचे केंद्र म्हणून पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा नावलौकिक सुध्दा झाला. 

       मा. भैय्यासाहेब पंकज बोरोले यांनी भारतात अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी इंग्लंड विद्यापीठातून व्यवस्थापन विषयात पदवीत्तर पदवी संपादन केली आहे. आपण घेतलेले शिक्षण आपल्या भागातील विद्यार्थ्यांच्या कामी यावे यासाठी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या सर्व विद्याशाखांचे अधिक बळकट व सक्षम स्वरूप करण्यासाठी त्यांनी काम सुरू केले . आपल्या ग्रामीण व आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांचे  ध्येय जागतिक स्वरूपाचे असावे यासाठी महत्त्वाचे पाऊल म्हणजे पंकज इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचे नाव पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल असे करून त्या शाळेला सी.बी.एस.ई. संलग्नता असणारी पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल चोपडा ही पहिली शाळा ठरली.

याचे श्रेय सर्वस्वी भैय्यासाहेब पंकज बोरोले यांच्या कार्यशैलीचे आहे.

              पंकज समूहाचा विस्तारलेला कारभार भैय्यासाहेब  पंकज बोरोले हे सक्षमपणे आणि यशस्वीरित्या सांभाळत आहेत. वक्तशीरपणा आणि शिस्त हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे. व्यस्त दिनचर्या असतानाही सामाजिक कामाची उर्मी असल्याने रोटरी क्लबच्या माध्यमातून मानवतेची सहृदयता जपताना ते दिसतात. भैय्यासाहेब पंकज बोरोले  रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष असतांना त्यांनी ज्यांच्या  घरात दिवाळी साजरी होत नाही अश्या आदिवासी बांधवांच्या घरी  जाऊन दिवाळीच्या सणानिमित्त आदिवासी बांधवांना फराळ वाटप केले, तसेच आदिवासी पाड्यात जाऊन वेगवेगळ्या आरोग्य  शिबिरांचे यशस्वी रित्या आयोजन केले.एवढेच नव्हे तर

स्त्रियांना सॅनिटरी पॅडचे वाटप केले. असे अनेक समाज उपयोगी कार्य त्यांनी केले. कोणत्याही आपत्तीत माणूस उन्मळून जात असतो. कोरोना महामारीच्या काळात माणसे असेच अस्वस्थ झाले होते. असा कोणताही व्यक्ती नाही त्याला कोरोनाची झळ पोहचलेली नाही अश्या भयावह व भीषण परिस्थितीत मा. भैय्यासाहेब पंकज बोरोले यांनी मानवता जिवंत ठेवत. या उदार भावनेतून गोरगरीब, व  कष्टकरी कुटुंबापर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे तसेच मास्क व  सॅनिटायझरचे वाटप केले.व पंकज समूहातील कर्मचाऱ्यांना आर्थिक भरीव मदत केली. तसेच प्रशासनासोबत लसीकरण मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग सुध्दा त्यांनी घेतला.ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण देणं लागतो.म्हणून त्या समाजाच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी मा.भैय्यासाहेब पंकज बोरोले यांचें कार्य अहोरात्र सुरू आहे.

              मा.भैय्यासाहेब पंकज बोरोले यांच्या विचारांची आणि कार्याची दखल अनेक सेवाभावी संस्था घेत आहेत. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल महामहीम भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना 

'बांबू सेवक' सन्मान पुरस्कार, प्रेरणा दर्पण फाऊंडेशनचा वतीने दिला जाणारा 'दर्पण 'पुरस्कार, 2022  हा मराठी अभिनेत्ते समीर चौगुले यांच्या हस्ते प्रधान करून त्यांना सन्मानित करण्यात आले.  नुकतीच त्यांची रोटरी  डिस्ट्रिक्ट 3030  च्या 2025 - 26  या  वर्षासाठी असि. गव्हर्नर पदी सुध्दा निवड झाली आहे .इंग्लड येथून एम.बी.ए.चे उच्च शिक्षण घेतलेले मा. भैय्यासाहेब पंकज बोरोले हे अतिशय सहृदय व संवेदनशील दुरदृष्टी असणारे व्यक्तिमत्व.स्वच्छ  चारित्र्य, अभ्यासू , नियोजनबद्ध काम, निर्व्यसनी व निर्गवी  भाव या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. 

         समाजात जगतांना कसे वावरले पाहिजे .हे शिकायचे असेल तर मा. भैय्यासाहेब पंकज बोरोले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. त्यांचा स्वभाव मितभाषी व प्रेमळ आहे. त्यामुळे मैत्रीचा त्यांचा खूप मोठा गोतावळा असून तो लाख मोलाचा आहे.वडील मा. दादासाहेब डॉ. सुरेश बोरोले आई सौ. हेमलताताई बोरोले , यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या अर्धांगिनी सौ.दिपालीताई बोरोले यांच्या साथीने  मा. भैय्यासाहेब पंकज बोरोले नेहमी सकारात्मक वाटचाल करतांना दिसतात. मा.भैय्यासाहेब पंकज बोरोले  यांच्या हातून अशीच समाज सेवा घडत राहो.‌यासाठी परमेश्वर त्यांना उदंड व निरोगी  दीर्घायुष्य आयुष्य देवो !! या त्यांना जन्मदिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा !!

                             * संकलन *

                     प्रा.डाॅ. अरुण डी. मोरे 

                            मराठी विभाग 

                      पंकज कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,

                                चोपडा..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

News Blogger Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable