"चोपडा तालुक्यात किमान आधारभूत किमती आधारे होणारी कापूस खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावे....शेतकरी कृती समिती ची मागणी.
चोपडा प्रतिनीधी- संदिप पाटील
......किमान आधारभूत किमती आधारे कापूस खरेदी केंद्र हे शेतमाल शेतकऱ्यांचे घरात आल्या आल्या सुरू झाले तर किमान बरा भाव शेतकऱ्यांना मिळतो,हे शासनाला माहित नाही असे नाही,तरी शासन जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना मारण्यासाठी खरेदी केंद्र वेळेवर सुरू करीत नाही,ते लवकर सुरू व्हावे यासाठी शेतकरी कृती समितीचे वतीने तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात कापूस सप्टेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांचे घरात आहे. मजबुरी ने ९०%शेतकऱ्यांनी तो विकला देखील ,पण किमान १०%ज्यांची थोडी फार धकवण्याची ऐपत होती त्यांना तरी किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी कापूस खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन करण्यात आले आहे.
निवेदनावर एस बी पाटील,प्रशांत पाटील,चंद्रकांत पाटील,अजित पाटील,भागवत महाजन,धनंजय पाटील,प्रकाश पाटील यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

