कोष्टी समाज युवा संघटना ३३व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूरातील विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि रोबोटिक्स कार्यशाळा
पोलीसराज मिडिया :- संदिप पाटील
कोष्टी समाज युवा संघटना ३३व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूरातील विद्यार्थ्यांना भविष्यातील संधींसाठी तयार करण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी एक अनोखी संधी उपलब्ध करून देणारी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि रोबोटिक्स कार्यशाळा पहिल्यांदाच श्री देवांग कोष्टी समाजाने चोंडेश्र्वरी हॉल, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला होता. सरोज ग्रुप, कोल्हापूर आणि डोक्यालिटी यांच्या भरीव सहकार्याने साकारलेला हा उपक्रम १४० हून अधिक विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाने रविवारी १९ जानेवारी २५ रोजी आगळ्या वेगळ्या रूपात संप्पन्न झाला.
या कार्यशाळेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक खेळण्यांची जोडणी व संचालन, फ्लाईंग ड्रोन, 3D प्रिंटर्स, व्हिज्युअल रियालिटी आणि RC एरोप्लेन हाताळण्याचा प्रत्यक्ष अनुभव विध्यार्थांनी घेतला. विशेष आकर्षण म्हणजे AI & Robotics या विषयावरचे माहितीपर सत्र, तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि विज्ञान-तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचा संधीपूर्ण अनुभव विध्यार्थी व पालकांना मिळाला.
समाजाच्या पुढील पिढीला आधुनिक युगाच्या आव्हानांसाठी तयार करणे, मुलांच्या सर्जनशील कल्पनांना प्रोत्साहन देणे, आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
सदर उपक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री बळीरामजी कवडे दादा – माजी अध्यक्ष कोष्टी समाज, संस्थापक बळीराम कवडे चॅरिटेबल ट्रस्ट व ज्येष्ठ तंत्रज्ञ आणि उद्योजक, समाजाचे अध्यक्ष श्री राजेंद्र ढवळे, उपाध्यक्ष राम मकोटे, मोहन हजारे, सेक्रेटरी गजानन समंग, ऑडिटर अनिल भंडारे, संचालक राहुल कवडे, श्री पियुष भरत जाधव – डायरेक्टर, सरोज ग्रुप ऑफ कंपनीज कोल्हापूर, श्री चारुदत्त पाटील आणि अजिंक्य पाटील – टेक्निकल एक्सपर्ट, डोक्यालिटी, कोल्हापूर, तसेच श्री विनायक पोतदार – कमर्शियल आर्टिस्ट असे मान्यवर उपस्थित होते. उदघाट्नप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र ढवळे यांनी या उपक्रमाबाबत विध्यार्थी वर्गास मार्गदर्शन केले. तसेच सेक्रेटरी गजानन समंग यांनी सदर कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे नियोजन शुभम वीर, सिद्धांत हजारे, ओंकार हजारे, अक्षय बुचडे, ओंकार कवडे तसेच महिलावर्ग आणि युवा कार्यकर्त्यांच्या उत्साहाने साकारले होते. हा उपक्रम कोल्हापूरच्या विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरणारा होता. या कार्यशाळेत फक्त कोल्हापूर शहर नसून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील विध्यार्थी सहभागी झाले होते. विदर्याथ्यांना दुपारच्या भोजनाची उत्तम व्यवस्था करण्याऱ्यात आली होती. यासोबत कार्यशाळेत सहभागी झालेबद्दल सर्व विदर्याथ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. पालक वर्गातून प्रतिक्रिया देताना सौ तनुजा भोसले यांनी सांगितले की अशा प्रकारची कार्यशाळा एक अभिनव उपक्रम होता यामुळे खेळण्या बागडण्याच्या वयात मुलांना अशा प्रकारचे ज्ञान योग्य वेळेत मिळणे गरजेचे आहे. कोष्टी समाज संस्था, युवा संघटना व सरोज ग्रुप या सर्वांचे आभार त्यांनी मानले.