महावितरण कंपनीचा मुख्य अधिकारी असल्याचा बनाव करुन धुळ्यात १३ लाख रुपयांची फसवणूक

Advertisement

महावितरण कंपनीचा मुख्य अधिकारी असल्याचा बनाव करुन धुळ्यात १३ लाख रुपयांची फसवणूक

 महावितरण कंपनीचा मुख्य अधिकारी असल्याचा बनाव करुन धुळ्यात १३ लाख रुपयांची फसवणूक


धुळे (पोलीसराज मिडिया) - एमएसईबीचे सीईओ असल्याचे भासवत १३ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या तीन जणांना गुजरात मधून बेड्या ठोकण्यात धुळ्याच्या सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना यश आले आहे. दरम्यान जनतेने कुणालाही आपल्या बँक खात्या संदर्भातील माहिती किंवा आवश्यक कागदपत्र देऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.



धुळे येथिल जय श्रीकृष्णा इंटरप्रायजेस या नावाने इलेक्ट्रिकल फर्मचे मालक जिजाबराव आनंदराव पाटील यांना विज वितरण कंपनीचे धुळे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ महाराष्ट्र विज वितरण कंपीनीचे एमडी लोकेश चंद्रा यांचे काहीतरी महत्वाचे काम आहे. त्यांचा फोन घेणे असा कॉल आला. त्यानंतर थोड्याच वेळात फिर्यादी यांचे व्हाट्सअप वर अननोन नंबर वरून कॉल आला. यात त्यांनी मैं लोकेश चंद्रा बोल रहा हु, एमएसईडीसीएल के डायरेक्टर मिटींग में बिझी हु, मेरे अंकल सुरत के हॉस्पीटल में अ डमिट है, उनका ऑपरेशन होना है, तो आप मुझे ८ लाख रुपये अरजेंट भेज दिजीए, मै आपके पैसे आज शाम तक लौटा दूंगा, असे सांगितले. म्हणुन फिर्यादीने तात्काळ खातेधारकाच्या खातेवर नेट बँकिंगद्वारे ८ लाख रुपये पाठविले. त्यानंतर पुन्हा दोन तासांनी फोन आला. अंकलच्या उपचाराकरीता आणखी ५ लाख रुपये पाटविण्याची विनंती केली. यावेळी त्याने दहिसर मुंबई येथील खाते नंबर दिले. त्यावर फिर्यादी यांनी आरटीजीएस द्वारे ५ लाख रुपये पाठविले. त्यानंतर फिर्यादी यांनी सायंकाळी आरोपीच्या
दिलेल्या फोन नंबरवर कॉल केला असता, त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही. त्यानंतर कार्यकारी अभियंता जोशी यांच्याकडुन चंद्रा यांचा नबर घेवून संपर्क केला असता चंद्रा यांनी कोणतेही पैशाची मागणी केली असल्याचे नाकारले. त्यानंतर फिर्यादी यांना त्यांचेबरोबर सायबर फसवणुक झाल्याचे समजले.

त्यावरुन सायबर पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली
व तपास अधिकारी पोलीस निरीक्षक घुसर यांच्या सायबर पथकाने गुन्हयाचे अनुषंगाने ४ महिने अथक प्रयत्न करुन सुरत येथुन या गुन्हयाशी संबंधीत तीन आरोपी यशवंत काशिनाथ पाटील, जयशंकर गोपाल गोसाई विजय शिवहरी शिरसाठ यांना ताब्यात घेवून
अटक केली. यासंदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जनतेला आवाहन केले आहे.

सायबर गुन्हेगार सामान्य जनतेतुन काही लोकांना ८ ते १० हजार रुपयांचे अमिष दाखवून बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी डिपॉझिट रक्कम देतात व खाते उघडल्यानंतर त्या खात्याचे एटीएम त्या खात्याला लिंक असलेले मोबाईल सिमकार्ड त्याचेकडुन घेतात. त्या खात्यावर सायबर द्वारे केलेल्या रक्कमेचा व्यवहार करतात. अशा प्रकारे खातेदार मोठ्या प्रमाणार सायबर आरोपी होत आहेत. त्यामुळे कोणीही आपले स्वतःचे नावाचे सिमकार्ड, स्वतःच्या नावाचे बैंक खात्याची माहिती व एटीएम कार्ड दुसऱ्या व्यक्तीस देवू नका अन्यथा तुम्ही सुद्धा आरोपी होवू शकतात. असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या