कवयित्री, शिक्षिका पुनम अनिल पाटील यांना आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्कार
जानेवारी १०, २०२५
0
कवयित्री, शिक्षिका पुनम अनिल पाटील यांना आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्कार
चोपडा प्रतिनीधी-संदिप पाटील
पुणे येथे भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा, आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियान व भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव आयोजित जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीव्हल २ ते ५ जानेवारी रोजी पुण्यातील एस एम जोशी सभागृहात पार पडला. यात मानाच्या 'आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न' पुरस्काराने कवयित्री व शिक्षिका पुनम अनिल पाटील यांना भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांच्या हस्ते पुणे येथे सन्मानित करण्यात आले.
देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा यावर विविध कविता लेखन, समाजात याबाबत केलेले कार्य, तसेच महिला सक्षमीकरण या कार्याची दखल घेऊन पुनम पाटील यांना हा 'आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्कार' देण्यात आला आहे. पुनम अनिल पाटील या तांदळवाडी (चोपडा)पितांबर हरी पाटील यांची कन्या तर स्व.भगवान उदा पाटील (पिंपळे सिम) यांच्या सूनबाई आहेत.
पुनम अनिल पाटील सध्या अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव या ठिकाणी शिक्षिका म्हणून कार्य करत आहेत.
Tags


