विष्णापूर येथे जितेंद्र महाजन यांचे शिबीरार्थी विद्यार्थी यांना स्वच्छ भारत मिशन बाबत मार्गदर्शन
चोपडा प्रतिनीधी-संदिप पाटील
विष्णापूर येथे भगिनी मंडळ संचलित, समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे सहभागी विद्यार्थ्यांचे विषेश हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे अनुदानित आदिवासी आश्रमशाळा विष्णापूर येथे आयोजन दिनांक ८ जानेवारी ते १४ जानेवारी २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे.
सदर राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीरार्थी विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन व तेथील विविध समस्या याबाबत माहिती मिळावी तसेच त्या समस्या सोडवण्यासाठी ज्ञान मिळावे यासाठी विविध व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते.
भगिनी मंडळ कॉलेज ऑफ सोशल वर्क अल्युमनी असोशियशन चोपडा चे अध्यक्ष तथा चोपडा पंचायत समिती स्वच्छ भारत मिशन चे तालुका समन्वयक जितेंद्र महाजन यांचे स्वच्छ भारत मिशन या योजने बाबत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते सदर व्याख्यानात त्यांनी स्वच्छ भारत मिशन योजनेबद्दल तसेच योजने अंमलबजावणी प्रोत्साहनपर निधी, वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता, शालेय स्वच्छता, कचऱ्याचे वर्गीकरण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, हागणदारीमुक्त गाव, अश्या विषयावर स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले तसेच स्वच्छ भारत मिशन बाबत गाव पातळीवर शौचालय वापराबाबत, प्लास्टिक वापर बंद करणे बाबत विद्यार्थ्यांनी गावागावात जनजागृती करणे संदर्भात आव्हान केलं.

तसेच पंचायत समिती चोपडा येथील महाराष्ट्र ग्रामीण जिवोन्नोती अभियानाचे समूह समन्वयक रमेश कोळी यांचे महिला सक्षमिकरण करणेसाठी, महिलामध्ये स्वयंरोजगाराचे कौशल्य विकसित करणेसाठी, महिलामध्ये गटाच्या माध्यमातून त्यांचा आर्थिक, शैक्षणिक विकास साधण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण जिवोन्नोती अभियान यशस्वीपणे काम करत आहे असे प्रतिपादन केले.
त्याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ संबोधी देशपांडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.उत्तम सोनकांबळे, पंचायत समिती चोपडा येथील महाराष्ट्र ग्रामीण जिवोन्नोती अभियानाचे समूह समन्वयक रमेश कोळी उपस्थित होते.