देशात पहिल्यांदाच शिवजयंतीत महात्मा फुलेंना अभिवादन

Advertisement

देशात पहिल्यांदाच शिवजयंतीत महात्मा फुलेंना अभिवादन

 देशात पहिल्यांदाच शिवजयंतीत महात्मा फुलेंना अभिवादन

पोलीसराज मिडिया :- संदिप पाटील 

जळगाव १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी झाली. यावर्षी शिवजयंतीचे वेगळेपण म्हणजे शेकडो वर्षांत देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रच नव्हेतर देशात अनेक ठिकाणी तसेच परदेशातही



शिवजयंतीत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत शिवजयंतीचे जनक प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


भिडेवाडाकार फुलेप्रेमी विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून साकारलेले देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत घराघरात शिवजयंती मनामनात शिवजयंती हे अभियान देशभरात राबवण्यात आले.

महाराष्ट्रातील पूर्ण, सातारा,

सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, वर्धा, अमरावती, यवतमाळ, जालना, नाशिक, धुळे, जळगाव, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर नगर अशा अशा अनेक जिल्ह्यात जिल्हापरिषद शाळा, खाजगी शाळा, बालवाडी, माध्यमिक शाळा, कॉलेज,

सार्वजनिक मित्र मंडळे, बुद्ध विहारे, समाज मंदिरे, चाचनालय, चौकाचौकात, बाजारपेठेत घरा घरात अशा अनेक ठिकाणी शिवजयंतीत क्रांतीसूर्य महात्मा फुलेंनाही अभिवादन करण्यात आले.



शाळा कलिंजातून विद्यार्थ्यांना शिक्षकांनी व बाहेर इतरत्र या अभियानातील फुलेप्रेमी संविधान दूतांनी शिवजयंतीचा खरा आणि वास्तव इतिहास विद्यार्थी आणि नागरिकांना व्यवस्थित समाजावून सांगितला. रायगडावरची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी

महात्मा फुलेंनी शोधून काढली तसेच जगात पहिल्यांदा शिवजयंती उत्सव महात्मा फुलेंनी साजरा केला तर महात्मा फुले हे शिवजयंती उत्सवाचे जनक प्रणेते ठरतात. हे आजवर अनेक विचारवंत, साहित्यिक, व्याख्याते यांनी पुस्तकातून लिहून ठेवले आहे, बोलले आहे पण ठोस पाऊल कुणीच उचलले नव्हते. त्यामुळे शिवजयंतीत क्रांतीसूर्य महात्मा फुलेंच्याही उत्तुंग कार्यकर्तृत्वाला आणि स्मृतींना उजाळा देण्यासाठी हे परायरात शिवजयंती मनामनात शिवजयंती हे अभियान विजय बडवेराय यांच्या संकल्पनेतून देशभर यशस्वीरित्या राबवले गेले. महाराष्ट्र, गोवा, गुजरात कर्नाटक, तेलंगणा, अस्ट्रेिलिया, स्विडन, लंडन, दुबई येथूनही या अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळाला.


शिवजयंतीत महात्मा फुलेंना अभिवादन हे देशात पहिल्यांदाच घडले आहे, त्यानिमित्ताने एक ऐतिहासिक घटना घडली. एक सकारात्मक, जनजागृती, खरा आणि वास्तव इतिहास लोकाभिमुख करणारा प्रबोधन पर लोकचळवळ उभारणारा ऐतिहासिक पायंडा आज देशात पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या