आजही तालुक्यातील तांदळवाडीत कालबाह्य प्रभात फेरी सुरूच...
तर वासुदेव आला हो वासुदेव आला झाला कालबाह्य
पोलीसराज मिडिया
संदिप पाटील
दि.10 /4/2025
प्रभातफेरी ही एक पारंपारिक भारतीय प्रथा आहे, ज्यामध्ये सकाळी मिरवणूक किंवा मेळावा असतो. "प्रभात" या शब्दाचा अर्थ "सकाळी" असा होतो आणि "फेरी" म्हणजे "मिरवणूक" किंवा "फेरी" असा होतो. ही प्रथा बहुतेकदा आध्यात्मिक किंवा धार्मिक महत्त्वाशी संबंधित असते, जिथे सहभागी रस्त्यावरून किंवा स्थानिक भागातून चालताना भक्तीगीते गातात, प्रार्थना करतात.
अशाच प्रकारे सकाळी चार लाजल्या पासून तांदळवाडीत विठु नामाचा गजर सुरू होतो,आपला आवाज प्रत्येका पर्यंत पोहचेल आणी जनमानसं सकाळी लवकर ऊठतील आणी "हरी नामाचं" नाव घेतील हीच अपेक्षा रोजच असते..
तांदळवाडी येथील ह.भ.प.श्री गुलाब वामन पाटील हे मागील चार वर्षापासून गावात न चुकता पाहटे चार वाजल्या पासून प्रभात फेरीला निस्वार्थ सुरवात करीत असतात.सकाळी लवकर ऊठून अंघोळपाणी आटोपून आपला नेहमीचा 'भगवा वस्त्र ' परिधान करून हनुमंत रायाचं दर्शन घेवून आपल्या मधुर आवाजात 'राम कृष्ण हरी ,मुकूंदा मुरारी हे नाथ नारायण वासूदेवा' देवाच्या नावाने आपल्या कार्याची सुरवात करतात.
प्रभातफेरीमध्ये भगवा वस्त्र परिधान करून हातात टाळांच्या गजरात गावातील लोकांमध्ये धर्मा विषयी जागरूकता निर्माण व्हावी ही धडपड दिसत असते.
गावातील आया बहिणी सकाळी अंगणात सडा मारून रांगोळी काढतात,सालगडी माणंस आपली गुरा ढोरांची काणे आवरतात, महादेव मंदीरावर जाणारे भावीक सकाळी लवकर ऊठावेत आणी आपल्या दिनचर्येला लागावेत.
प्रभात फेरीचे अनन्य महत्व संतांनी सांगितले आहे.प्रभातफेरीचे प्राथमिक उद्दिष्ट सकारात्मकता पसरवणे, सामुदायिक भावना वाढवणे आणि धार्मिक भक्ती बळकट करणे हे आहे. ते समुदायाची आध्यात्मिक जाणीव जागृत करण्याचा एक मार्ग देखील असू शकतो.
आजच्या धावपडीच्या युगात कोणी कोणासाठी थांबत नाही.हे जग कुठल्या कुठे चालले आहे.जगाची प्रगती किती झपाट्याने होते आहे.परंतू मणुष्याचा शेवट राम नामानेच होतो कारण रामाचे नावच एक सत्य यात शंकाच उरत नाही.म्हणून सकाळी लवकर ऊठून "राम कृष्ण हरी" म्हणा.

