ऑलिम्पियाड परीक्षेत विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलचे घवघवीत यश....
चोपडा प्रतिनिधी:
इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेचा नुकताच दुसऱ्या राऊंडचा निकाल जाहीर झाला असून विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट एक्सलन्स अवॉर्ड व स्कॉलरशिप मिळवून यश संपादन केले आहे.
या परीक्षेस शाळेतील ५०० हूुन अधिक विदयार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यातील २०० हून अधिक विद्यार्थी हे दुसऱ्या राउंड साठी पात्र ठरले आहेत .यात सर्वेश निलेश वानखेडे इ1ली ( English) , अनया प्रशांत देशमुख इ. 7वी (Sci) वैष्णवी विश्वेश्वर जाधव इ8वी ( maths) जयेश देवराज इ. 8वी (GK) सोहम कुंदन पाटील इ. 8वी ( English) वेद मनोज चित्रोड इ. 9वी (maths) प्रथमेश कमलाकर पाटील इ. 9वी ( Sci) या विदयार्थ्यांनी एक्सलन्स मेडल अवॉर्ड मिळविले. स्टेट लेवलला टॉपर आलेले व स्काॅलरशिप मिळविलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे...
नव्या कल्पेश सुराणा इ. 8वी(Sci) 1200रू स्काॅलरशिप,
विहान अमोल मोदी इ. 6वी (maths) 1000 रू स्काॅलरशिप,
सुजल प्रदिप मुंद्रे इ. 10वी (Sci) 1000 रू स्काॅलरशिप सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सह सचिव तसेच सर्व पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक, इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका,
विद्यालयातील पर्यवेक्षक सर्व अधिकारी वर्ग तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे...

