ब्रह्माकुमारीज संस्थेच्या दादी रतनमोहिनी व लता दिदींना श्रद्धांजली कार्यक्रम व ब्रह्माभोजनाचे आयोजन.....
चोपडा प्रतिनिधी: संदिप पाटील
प्रजापिता ब्राह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्य प्रशासक राजयोगिनी दादी रतनमोहिनी यांनी १०१ व्या वर्षी अहमदाबादमधील जायडस रुग्णालयात आपले शरीर सोडले. तर चोपडा सेंटरचे ज्येष्ठ बंधू शांताराम भाईजीच्या युगल लता दिदींनी ३० मार्च २०२५ रोजी आपले शरीर सोडले. त्यानिमित्ताने तेराव्याचा कार्यक्रम तसेच रतन मोहिनी दीदी व लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने चोपडा ओम शांती केंद्रात ब्रह्मा भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
शिस्तबद्ध आणि संयमी जीवन जगलेल्या रतनमोहिनी दादी यांनी देश-विदेशातील लाखो व्यक्तींच्या जीवनात मूल्यसंस्कार रुजविली. जगातील सर्वांत मोठ्या आध्यात्मिक संस्थेचे नेतृत्व करीत हसतमुखाने आणि मधुरवाणीने त्यांनी संस्थेशी जोडलेल्या परिवारांना कुटुंबप्रमुखाचे प्रेम दिले. त्यांचा साधक वर्ग, तसेच राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांनी रतनमोहिनीदादी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
चोपडा ओम शांती केंद्राचे ज्येष्ठ भाई शांताराम पाटील यांच्या युगल लता दीदींनी चाळीस वर्षाच्या सुखद संसार सांभाळून ओम शांती केंद्रात अविरतपणे सोबत सेवा दिली व शेवटच्या क्षणी त्यांचे शरीर दुर्धर झाले असताना त्यांची सेवा शांताराम भाईनी अविरतपणे केली व त्यांच्या तेराव्या च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व प्रजापिता ईश्वरी विश्वविद्यालय च्या प्रमुख रतनमोहिनी दिदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्ताने शांताराम भाईंच्या वतीने चोपडा येथील ओम शांती केंद्रात ब्रह्मा भोजनाचे आयोजन केले होते.
यावेळी जळगाव जिल्ह्यातील सर्व ओम शांती केंद्राच्या संचालिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सदर श्रद्धांजली कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी ,माजी आमदार कैलास बापू पाटील, चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन घनश्याम अण्णा पाटील , प्रा. सोमनाथ वडनेरे, शिव केला एजन्सीचे संचालक राजूभाई शर्मा , राजू अण्णा पाटील , शांताराम भाईं , मीनाक्षी दीदी ( जळगाव ) , पुष्पा दीदी ( भडगाव ) , मीरा दीदी ( पाचोरा ) , नीता दीदी ( धरणगाव ) , पुष्पा दीदी ( एरंडोल ) , मीरा दीदी ( कासोदा ) , विद्या दीदी ( अमळनेर ) यासह अनेक मान्यवरांनी शब्दसुमनानी श्रद्धांजली अर्पण केली .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी चोपडा ओम शांती केंद्राच्या संचालिका मंगला दीदी ,सारिका दीदी , करिश्मा दीदी आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल दीदी यांनी केले.


