चोपडा तालुका मुद्रांक विक्रेता संघाच्या तालुकाध्यक्ष संतोष सपकाळे यांची निवड
चोपडा प्रतिनीधी- संदिप पाटील
चोपडा तालुका मुद्रांक विक्रेता (स्टॅम्प वेंडर) संघटनेची तालुका कार्यकारणीची मुदत संपल्याने आज दि. २४/०४/२०२५ रोजी सर्व मुद्रांक विक्रेते (स्टॅम्प वेंडर) यांच्या मिटींग मध्ये सर्वानुमते श्री. संतोष वामनराव सपकाळे यांची चोपडा तालुका मुद्रांक विक्रेते (स्टॅम्प वेंडर) संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सर्व मुद्रांक विक्रेते (स्टॅम्प वेंडर) हजर होते. संदीप जगतराव पाटील, रविंद्र मराठे, पुरुषोत्तम साळुंखे, मयुर विसावे, प्रभाकर महाजन, प्रभाकर पाटील, परेश गुजराथी, प्रशांत अनवर्देकर, दत्तात्रय बंदीछोड, शरद चौधरी, संजय देशपांडे, निर्मल जाधव व मोतिलाल सोनवणे इत्यादी हजर होते.

