*"कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू" अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ*
चोपडा दि.२ (प्रतिनिधी): संदिप पाटील
स्वच्छ भारत मिशन (टप्पा २ ) अंतर्गत "कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू" ही विशेष मोहीम दि.०१ मे २०२५ ते दि.१५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे स्वच्छ भारत मिशन (टप्पा २ ) अंतर्गत "कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू" वाटचाल दृश्यमान शाश्वत स्वच्छतेकडे या अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ ग्रामपंचायत खडगाव ता चोपडा येथे चोपडा विधानसभा मतदारसघांचे आमदार मा.प्रा.आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
त्याप्रसंगी प्रसंगी गटविकास अधिकारी अनिल विसावे, विस्तार अधिकारी पंचायत जितेंद्र पाटील, विस्तार अधिकारी शिक्षण उत्तम चव्हाण, स्वच्छ भारत मिशन चे तालुका समन्वयक जितेंद्र महाजन,सरपंच सौ कविता रविंद्र चव्हाण, उपसरपंच रविंद्र पाटील, सदस्य राजेंद्र पाटील, पोलीस पाटील दत्तात्रय पाटील ,रोहिदास कोळी, उज्ज्वल पाटील, राहुल पाटील रवींद्र चव्हाण प्रविण पाटील, अरुण बाविस्कर, मंगल बाविस्कर, बापू बाविस्कर, जितू कोळी, तुषार पाटील,निंबा पाटील,प्रशांत महाजन आदी उपस्थित होते. पुढे बोलताना मा.आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे म्हणाले कुटुंब पातळीवरच कचरा वर्गीकरण करून तसेच गावातला कचरा वर्गीकरण करून कंपोस्ट पीट मध्ये पुरल्यास आपल्याला शेतासाठी उपयुक्त असे सेंद्रिय खत आपल्यालाच उपलब्ध होईल. तसेच आज शेतात रासायनिक खताचा वापर वाढल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊन आपलं आरोग्य खराब होत तरी तालुक्यातील प्रत्येक गावात ही मोहीम राबवून त्याची यशस्वी अंमलबजावणी करावी अश्या सूचनाही या प्रसंगी त्यांनी दिल्या.
*अभियानाचे उद्दिष्ट:*
गावांची संपूर्ण स्वच्छता करण्याबरोबरच ग्रामीण भागातील गावांना दृष्यमान स्वच्छतेचा अपेक्षित दर्जा मिळवून देणे, ग्रामीण जनतेत स्वच्छते विषयक वर्तणुकीत बदल घडवून आणने
सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करून वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच शाश्वत सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व पटवून देणे
घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा व पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी, कचरा कमी करणे, पुनर्वापर करणे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी शिक्षण उत्तम चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार तालुका समन्वयक जितेंद्र महाजन यांनी केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत अधिकारी मंगेश धनगर,तालुका समूह समन्वयक सचिन पाटील, शिपाई बाळू भिल व ग्रामपंचायत सदस्य
यांनी परिश्रम घेतले.


