जळगाव जिल्ह्यातील पिंपळेसिम गावातील कवयित्री, फुलेप्रेमी पुनम अनिल पाटील संविधान दूत राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
जळगाव:- २४ मे रोजी राज्यस्तरीय संविधान जागर काव्य संमेलन एस, एम जोशी सभागृह पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. आयोजक... कवी, संगीतकार, गीतकार, गिनीजबुक रेकॉर्डर भिडेवाडा कार, फुले प्रेमी, संविधान दूत आ. विजय वडवेराव सर यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझं संविधान माझी जबाबदारी हा उपक्रम चालू आहे.
संविधानातील हक्क, अधिकार, कर्तव्य, नैतिक मूल्य तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा हा त्यांचा जगावेगळा अट्टाहास यालाच साद घालत त्यांच्याच प्रेरणेने व आशिर्वादाने पिंपळेसिम गावातील हल्ली मुक्काम जळगाव येथील पुनम अनिल पाटील संविधान जागराच कार्य जोमाने करत आहेत. हळदी कुंकू समारंभामध्ये, शाळेमध्ये, मंदिरामध्ये, शाळा, क्लास मध्ये, परिवारात,मैत्रिणीकडे, पोलिस स्टेशन थोडक्यात सर्व ठिकाणी त्या प्रचार, प्रसाराच काम करत असतात. त्यांच्या कामाची दखल घेत, त्यांना या संमेलनात राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे मोफत प्रवेश तरीही चहा, नाश्ता, जेवण उच्च दर्जाचे होते. सर्वच कवी, कवयित्रींना अध्यक्ष म्हणून सन्मान देण्यात आला होता. सर्व कवयित्रींच्या कपाळी आडवे कुंकू शोभत होते. या संमेलनात सादर करण्यात आलेल्या कविता उत्कृष्ट होत्या. खेळीमेळीच्या वातावरणात संमेलन पार पडले. कवी विजय वडवेराव सरांच्या कार्याची इंडियन बुक रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे, त्याबद्दल पुणे फुलेप्रेमी टीम तर्फे त्यांचा सुद्धा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.संपूर्ण संविधान दूतांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांचा परिवार व गावातील लोकांकडून त्यांचे कौतुक होतं आहे. पुनम अनिल पाटील या अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल,जळगाव शाळेत मराठी विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.पुनम पाटील या पितांबर हरी पाटील, तांदळवाडी यांच्या कन्या व स्व.भगवान उदा पाटील पिंपळेसिम यांच्या सुनबाई आहेत. जैन इरिगेशन, जळगाव येथे इंजिनियर म्हणून कार्यरत असणाऱ्या अनिल भगवान पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांना पुढील कार्यास भरभरून शुभेच्छा.

