लासुर येथे महाकाल गृप च्या वतीने भव्य रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन
लासुर येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून *महाकाल गृप लासुरच्या वतीने भव्य रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन* माळी समाज मंगल कार्यालय लासुर येथे सकाळी १०:३० करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे *अध्यक्षस्थानी क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश चे अध्यक्ष ए के गंभीर सर हे होते शिबीराचे उदघाटन भारतीय सैन्य दलाचे सुभेदार अमोल माळी हे होते*.
प्रमुख अतिथी म्हणून चोपडा सूतगिरणी चे संचालक अमृतराव वाघ, चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक नंदकिशोर सांगोरे सर, संचालक मनोज सनेर, संत सावता महाराज पतसंस्थेचे चेअरमन कैलास महाजन सर, वि का सो चेअरमन योगेश दगडू पाटील, व्हा. चेअरमन जगन्नाथ माळी, किसान विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश फुलचंद सुराणा, क्षत्रिय माळी समाज विकास मंडळाचे उपाध्यक्ष रामकृष्ण माळी, सह सचिव अरुण माळी, माऊली महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ भावना राजेंद्र महाजन, उपाध्यक्ष देवकाबाई रतन महाजन, सचिव चंद्रकला कैलास माळी, चोपडा शेतकी संघांचे संचालक नारायण पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन अहिरे, समता प्रतिष्ठान शिरपूर चे अध्यक्ष भटू पाटोळे सर, माजी सरपंच देवीलाल बाविस्कर, पत्रकार दिलीप पालिवाल, अजय पालिवाल, डॉ.अरुण देसले, डॉ. अशोक पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य, व विविध संस्थाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
सदर शिबीरात किसान विद्या प्रसारक मंडळाचे माजी उपाध्यक्ष अजय पालिवाल, माजी सरपंच देवीलाल बाविस्कर, चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक नंदकिशोर सांगोरे सर, संचालक मनोज सनेर, माऊली महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ भावना महाजन, चोपडा सूतगिरणीचे संचालक अमृतराव वाघ यांनी मनोगत व्यक्त केले तसेच अध्यक्षयी मनोगत ए के गंभीर सर यांनी व्यक्त केले.
*सदर शिबिरात ३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच ८५ ग्रामस्थांचे, महिला व युवकांचे रक्तगट तपासणी करण्यात आले.*
सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाकाल गृप चे अध्यक्ष पवन महाजन, उपाध्यक्ष साहेबराव मगरे, सचिव कल्पेश माळी, सह सचिव अमोल गंभीर, खजिनदार निलेश राजकुळे, सदस्य भुमेश्वर मगरे, प्रेमराज शेलकर, महेंद्र माळी, आर डी महाजन, महेश महाजन, विनोद मगरे, नितीन माळी, योगेश माळी, मनोज महाजन आदी यांनी मेहनत घेतली.
सदर शिबीराचे सूत्रसंचलन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी तर आभार जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा सदस्य महाकाल गृप महेंद्र माळी यांनी केले.

