अमृत अभय बंग यांचे युवा निर्माण हेच राष्ट्र निर्माण विषयावर चोपड्यात व्याख्यान
चोपडा ( प्रतिनिधी ) येथील विवेकानंद विद्यालयात स्वर्गीय यशवंत गोविंद हरताळकर उर्फ नानासाहेब, माजी मुख्याध्यापक व सेक्रेटरी चोपडा शिक्षण मंडळ चोपडा. यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक 7 डिसेंबर 2025 रविवार दुपारी 4 : 30 वाजता पद्मश्री डॉ. अभय बंग आणि पद्मश्री डॉ. राणी बंग यांचे धाकटे चिरंजीव ज्यांनी
आज पर्यंत 22 हुन अधिक राज्यातील 3500 हून अधिक तरुणांनी निर्माण प्रक्रियेतून प्रशिक्षण घेत त्यातील 750 हून अधिक तरुण आज भारतातील 130 हून अधिक सामाजिक संस्थांमध्ये पूर्ण वेळ सामाजिक कार्यात सक्रियपणे कार्यरत आहेत असे महाराष्ट्रातील गडचिरोली येथे निर्माण या युवा उपक्रमाचे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत असलेले एक सामाजिक कार्यकर्ते आणि अभियंता ज्यांचे युवा निर्माण हेच राष्ट्र निर्माण या विषयावर सुंदर व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे.व्याख्यात्यांचा व्याख्यानाचा उद्देश असा आहे की उच्च शिक्षण घेतलेल्या हुशार आणि संवेदनशील तरुणांना अर्थपूर्ण जीवनाचा शोध घेण्यास मदत मिळावी.फक्त ग्राहक न बनता जागृत आणि प्रबुद्ध नागरिक बनण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करणे. समाजातील आरोग्य ,शिक्षण,शेती, पर्यावरण अशा विविध गंभीर समस्यांवर काम करू शकणारे युवा नेतृत्व तयार करणेहोय. अशा या सुंदर व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक डॉ. विकास हरताळकर , हरताळकर हॉस्पिटल व परिवार तसेच विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र चोपडा यांनी केले आहे.
