चोपडा नगरपालिकेच्या उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची बिनविरोध निवड तर भाजप शिवसेनेच्या राष्ट्रवादी गटाच्या गटनेतेपदी भाजपचे नगरसेवक गजेंद्र जैस्वाल यांची निवड
पोलीसराज मिडिया : संदीप पाटील
चोपडा नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष व स्विकृत सदस्यांची बिनविरोध निवड श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात वार-बुधवार, दि. १४-०१-२०२६ रोजी दुपारी १-०० वाजता सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती .
सभेचे अध्यक्षस्थान मा अध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील यांनी भूषविले. सभेत गटनेता योगेंद्र (पियुष) राजेंद्र चौधरी, रमाकांत नथु ठाकुर, विरोधी गटनेता गजेंद्र अरविंद जैस्वाल, २१ सन्मानित नगरसेवक, मुख्याधिकारी रामनिवास झंवर व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. उपाध्यक्ष पदासाठी प्राप्त प्रस्ताव 1. श्री. बोरोले पंकज सुरेश सुचक तर योगेंद्र (पियुष) राजेंद्र चौधरी हेअनुमोदकः रमेश ग्यानोबा केवळ एकच प्रस्ताव प्राप्त झाल्याने बोरोले पंकज सुरेश यांची उपाध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात आली.
तर स्वीकृत सदस्य पदासाठी प्राप्त नामनिर्देश शिवसेना अपक्ष गट मोहम्मद हनिफअब्दुल सत्तार भारतीय जनता पार्टी , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गट/आघाडी दीपक भगवंतराव पाटील स्वतंत्र -टिळक मुलजी शाह सर्व तीन नामनिर्देश वैद असल्याने मोहम्मद हनिफ अब्दुल सत्तार,दीपक भगवंतराव पाटील,व तिलकचंद मुलजी शाह ,यांची बिनविरोध निवड करण्यात आली .सभेचे कामकाज दुपारी १:४७ वाजता समाप्त झाले .अध्यक्षांनी उपस्थितीत सर्वाचे आभार मानले .तर श्री गजेंद्र जयस्वाल यांच्या गटनेतेपदी निवडीचे मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, मंत्री रक्षा खडसे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रोहित निकम, राकेश पाटील, शहराध्यक्ष नरेंद्र पाटील, जीवन चौधरी यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरुणभाई गुजराथी, चंद्र-हास गुजराथी, सुनील जैन यांनी स्वागत केले
