पंकज विद्यालयात 'शब्दांची सुवर्ण पहाट'; चिमुकल्यांच्या वेशभूषेने जिवंत केला महाराष्ट्राचा इतिहास

Advertisement

पंकज विद्यालयात 'शब्दांची सुवर्ण पहाट'; चिमुकल्यांच्या वेशभूषेने जिवंत केला महाराष्ट्राचा इतिहास

 

पंकज विद्यालयात 'शब्दांची सुवर्ण पहाट'; चिमुकल्यांच्या वेशभूषेने जिवंत केला महाराष्ट्राचा इतिहास


चोपडा:- संदीप पाटील

"मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे," असे प्रतिपादन पंकज विद्यालय प्राथमिक विभागाच्या मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात करण्यात आले. कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी अभंग, कविता आणि नृत्यातून मराठी संस्कृतीचा अनोखा आविष्कार सादर केला.


​कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत मातृभाषेचे महत्त्व पटवून दिले.

इतिहासाचे सजीव चित्रण
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व वेशभूषा सादरीकरण. विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यातील आणि इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांची वेशभूषा परिधान करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच, चित्र रेखाटन स्पर्धेतून महाराष्ट्राची संतपरंपरा आणि संस्कृती मांडली.
 अध्यक्षस्थानी असलेले डॉ. अरुण मोरे यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेला 'संस्कारांची शिदोरी' असे संबोधले.
​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप जैस्वाल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशासाठी शिक्षक दिलीप जैस्वाल, मनोज अहिरे, विजय राठोड आणि सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी 'मराठी भाषा संवर्धनाचा' सामूहिक संकल्प करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या