जळगावात महाराणा प्रतापसिंहांचा राज्याभिषेक दिन उत्साहात; श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचा दुग्धअभिषेक सोहळा

Advertisement

जळगावात महाराणा प्रतापसिंहांचा राज्याभिषेक दिन उत्साहात; श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचा दुग्धअभिषेक सोहळा

जळगावात महाराणा प्रतापसिंहांचा राज्याभिषेक दिन उत्साहात; श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचा दुग्धअभिषेक सोहळा

जळगाव: संदीप पाटील 

हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त जळगाव शहरात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना जळगाव जिल्हा टीमच्या वतीने दुग्धअभिषेक सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. शहरातील महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याजवळ आयोजित या कार्यक्रमात राजपूत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्साहपूर्ण वातावरणात हा दिवस साजरा केला.


दुग्धअभिषेक आणि जयघोषाने परिसर दुमदुमला

करणी सेनेचे जळगाव शहर जिल्हा अध्यक्ष किरणभाऊ राजपूत यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंहांच्या पुतळ्यास दुग्धअभिषेक करण्यात आला. तसेच, विधिवत पूजन आणि माल्यार्पण करून त्यांच्या शौर्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी दिलेल्या 'जय महाराणा'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीमय झाला होता.

मान्यवरांची उपस्थिती

याप्रसंगी जळगाव महापालिकेच्या महापौर सौ. दीपमाला काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्यासह उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक ॲड. सुचिता हाडा, नरेंद्रसिंह पाटील, माजी नगरसेवक अतुलसिंह हाडा, पिंटूभाऊ काळे, ॲड. देवीसिंह पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

​तसेच, करणी सेनेच्या जिल्हा अध्यक्षा सारिकाताई पाटील, कार्याध्यक्ष प्रवीणसिंग पाटील, प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत, खान्देश विभाग प्रमुख विलाससिंह पाटील, जिल्हा अध्यक्ष किरण राजपूत यांच्यासह भगवान खंडाळकर, विठ्ठलसिंह राजपूत, रतनसिह परदेशी, बोधराज राजपूत, चंद्रशेखर राजपूत, संजना राजपूत, रोशन राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.

आदर्शांचे पालन करण्याचे आवाहन

यावेळी बोलताना महापौर दीपमाला काळे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या त्याग, शौर्य आणि स्वाभिमानाच्या इतिहासाचे स्मरण केले. समाजाने त्यांच्या आदर्शांचा अवलंब करून देशाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले.

​हा दुग्धअभिषेक सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला, ज्यामध्ये राजपूत समाजातील महिला आणि बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या