पंकज ग्लोबल स्कूलच्या मैदानावर यशाचा गुलाल; वार्षिक पारितोषिक सोहळा 'कडक' उत्साहात संपन्न!

Advertisement

पंकज ग्लोबल स्कूलच्या मैदानावर यशाचा गुलाल; वार्षिक पारितोषिक सोहळा 'कडक' उत्साहात संपन्न!

पंकज ग्लोबल स्कूलच्या मैदानावर यशाचा गुलाल; वार्षिक पारितोषिक सोहळा 'कडक' उत्साहात संपन्न!

ऐतिहासिक शिव-प्रदर्शनाने उलगडला गौरवशाली इतिहास; विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव

चोपडा | विशेष प्रतिनिधी:

संदिप पाटील 

केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर मैदानी खेळ आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल मध्ये दोन दिवसीय वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत दिमाखात पार पडला. विद्यार्थ्यांच्या अष्टपैलू कामगिरीचा गौरव करण्यासाठी आयोजित या सोहळ्याला पालक आणि मान्यवरांची अभूतपूर्व गर्दी लाभली होती.


यशाची गौरवगाथा आणि मान्यवरांची मांदियाळी

​कार्यक्रमाचे उद्घाटन पंकज शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी अध्यक्ष पंकज बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक गोकुळ भोळे, सौ. हेमलताताई बोरोले व सौ. दिपालीताई बोरोले यांची प्रमुख उपस्थिती होती.


​व्यासपीठावर MPSC यशस्वी डॉ. कपिल पाटील, डॉ. नीलिमा चौधरी, निवृत्त आर्मी ऑफिसर संतोष माळी, पीएसआय सचिन चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर मिसर, नगरसेवक प्रवीण देशमुख, अभियंता संदीप महाजन, अ‍ॅड. रुपेश पाटील आणि प्राचार्य मिलिंद पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.

शिवगर्जना: ऐतिहासिक प्रदर्शनाने वेधले लक्ष

​या सोहळ्याचा सर्वात मोठा 'हायलाईट' म्हणजे शिवप्रेमी संकेत गांगुर्डे यांनी भरवलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील भव्य ऐतिहासिक प्रदर्शन. आजच्या काळात पाठ्यपुस्तकातून इतिहास पुसट होत असताना, या प्रदर्शनाने शिवरायांचा जाज्वल्य इतिहास विद्यार्थ्यांसमोर जिवंत केला. पालकांनी या उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक केले.

​"विद्यार्थी दशेत अपयशाला न घाबरता संघर्षाला भिडायला शिका, यश तुमचेच असेल," असा मूलमंत्र डॉ. कपिल पाटील यांनी आपल्या भाषणातून दिला.


मैदानावरील वाघांचा सुवर्ण गौरव

​केवळ वर्गातच नाही, तर क्रीडा मैदानावरही छाप पाडणाऱ्या खेळाडूंचा गोल्ड, सिल्वर आणि ब्राँझ पदके देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पदक विजेत्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या डोळ्यातील समाधान या सोहळ्याची फलश्रुती ठरली.

संयोजन आणि सूत्रसंचालन

​कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शुभांगी पाटील, स्वाती शिंदे यांच्यासह नववीतील विद्यार्थिनी दिव्या महाजन, तनिष्का महाजन, देवयानी चोले, दिशा पाटील, दर्शली पाटील आणि स्वराली चौधरी यांनी आपल्या शैलीदार वाणीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक उपमा जयस्वाल, शारदा अहिरे, स्वाती सोनवणे व प्रीती पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या