जळगाव: श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे महिला दिन उत्साहात; आशालता राजपूत यांची जिल्हा सचिवपदी नियुक्ती

Advertisement

जळगाव: श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे महिला दिन उत्साहात; आशालता राजपूत यांची जिल्हा सचिवपदी नियुक्ती

जळगाव: श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे महिला दिन उत्साहात; आशालता राजपूत यांची जिल्हा सचिवपदी नियुक्ती

जळगाव: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने जळगाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संघटनेच्या जिल्हा सचिवपदी सौं. आशालता ताई राजपूत यांची निवड करण्यात आली असून, महिला सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला.


नूतन पदग्रहण सोहळा

​राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा अॅड. श्रीमती शिलाजी सुखदेव दादा गोगामेडी यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश अध्यक्षा सौं. छायाताई मेहेर यांच्या मार्गदर्शनानुसार ही निवड करण्यात आली. जिल्हा अध्यक्षा सौं. सारिकाताई राजपूत यांच्या हस्ते आशालता ताईंना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी संघटनेच्या माध्यमातून महिलांच्या समस्या सोडवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

कायदेविषयक मार्गदर्शन व प्रबोधन

​महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या अॅड. भारती कुमावत यांनी उपस्थित महिलांना मोलाचे कायदेविषयक मार्गदर्शन केले. महिलांनी स्वतःच्या हक्कांबाबत जागरूक राहणे काळाची गरज असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून पटवून दिले.

'संघटन हेच सामर्थ्य' - सारिकाताई राजपूत

​कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात सौं. सारिकाताई राजपूत यांनी महिलांना संघटित होण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या:

​"माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, मदर तेरेसा आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महान महिलांचा आदर्श समोर ठेवून आपण कार्य केले पाहिजे. समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे संघटन अत्यंत महत्त्वाचे आहे."


महिलांची उपस्थिती

​या सोहळ्याला करणी सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष सौं. मीनाताई राजपूत, नीलिमा ताई पाटील, आशाताई राजपूत, लताताई राजपूत, शुभांगी राजपूत यांच्यासह भारतीताई राजपूत, रेखाताई राजपूत, सुमन पाटील, अलका पाटील, सुलभा पाटील, सोनाली पाटील, संगीता गालफाडे, दिपाली धांडे, कीर्ती खैरनार व इतर मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या