पोलीसराज मीडिया विशेष: संशयाचे भूत ठरले घातक! पत्नीवर खुनी हल्ला करणाऱ्या नराधमाला ७ वर्षे सक्तमजुरी

Advertisement

पोलीसराज मीडिया विशेष: संशयाचे भूत ठरले घातक! पत्नीवर खुनी हल्ला करणाऱ्या नराधमाला ७ वर्षे सक्तमजुरी

पोलीसराज मीडिया विशेष: संशयाचे भूत ठरले घातक! पत्नीवर खुनी हल्ला करणाऱ्या नराधमाला ७ वर्षे सक्तमजुरी

अमळनेर | पोलीसराज मिडिया

चारित्र्यावर संशय घेऊन आपल्याच पत्नीचा गळा चिरून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमळनेर येथील एका नराधमाला न्यायालयाने कठोरात कठोर शासन सुनावले आहे. आरोपी भगवान रामदास शिंपी (वय ६०) याला खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ७ वर्षे सक्तमजुरी आणि रोख दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


काय आहे संपूर्ण प्रकरण?

​ही घटना १ नोव्हेंबर २०२३ रोजी अमळनेर शहरातील ताडेपुरा भागात घडली होती. फिर्यादी महिला मजुरीचे काम करून घरी परतली असताना आपल्या मुलीशी फोनवर बोलत होती. याच कारणावरून आरोपी पती भगवान शिंपी याने तिच्यावर संशय घेतला आणि अश्लील शिवीगाळ केली.

🎇आमच्याकडे NCMC कार्ड काढुन मिळेल 🎇

​रात्री ८ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला घराबाहेर ओट्यावर बसलेली असताना, नराधम पतीने खिशातील धारदार चाकू काढून थेट तिच्या गळ्यावर वार केला. जीव वाचवण्यासाठी महिलेने प्रतिकार केला असता तिच्या दोन्ही हातांवरही गंभीर जखमा झाल्या. सुदैवाने मुलगा आणि शेजारील लोक वेळेवर धावून आल्याने मोठा अनर्थ टळला.

न्यायालयीन रणसंग्राम आणि निकाल

​या खटल्याचे कामकाज मा. जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश श्रीमती सी. बी. पाटील यांच्या न्यायालयात चालले. सरकारी वकील ॲड. के. आर. बागुल यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपीविरुद्ध सबळ पुरावे सादर केले.

न्यायालयाने दिलेला दणका:

  • भादंवि कलम ३०७ (जीवे मारण्याचा प्रयत्न): ७ वर्षे सक्तमजुरी व २००० रुपये दंड.
  • जीवे मारण्याची धमकी: २ वर्षे सक्तमजुरी व १००० रुपये दंड.

या अधिकाऱ्यांचे लाभले सहकार्य

​या प्रकरणाच्या तपासात आणि न्यायालयीन प्रक्रियेत अमळनेर, चोपडा ग्रामीण, चोपडा शहर, मारवड आणि अडायवड पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी मोलाची भूमिका बजावली. यामध्ये पो.हे.कॉ. पुरुषोत्तम वाल्डे, पी.एस.आय. उदयसिंग साळुंखे, पो.कॉ. राहुल रणधीर, प्रमोद पाटील, सतीश भोई आणि भरत इशी यांचे विशेष सहकार्य लाभले.

संपादकीय मत: कौटुंबिक हिंसाचार आणि संशयातून होणारे गुन्हे समाजासाठी घातक आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशा प्रवृत्तींना मोठा जरब बसणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या