धक्कादायक: चोपडा तालुक्यातील नारोद येथे रक्ताचे नाते रक्तानेच माखले; सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या!

Advertisement

धक्कादायक: चोपडा तालुक्यातील नारोद येथे रक्ताचे नाते रक्तानेच माखले; सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या!

धक्कादायक: चोपडा तालुक्यातील नारोद येथे रक्ताचे नाते रक्तानेच माखले; सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या!

चोपडा (विशेष प्रतिनिधी): संदीप पाटील
चोपडा तालुक्यातील नारोद गावातून एक हृदयद्रावक आणि थरारक घटना समोर आली आहे. घरगुती वादाचे पर्यवसान थेट खुनात झाले असून, मोठ्या भावाने आपल्याच सख्ख्या धाकट्या भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण चोपडा तालुका हादरून गेला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?
​मिळालेल्या माहितीनुसार, नारोद येथील रहिवासी किरण पानाचंद पाटील (वय २७) आणि त्याचा लहान भाऊ रोहन पानाचंद पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होते. दि. २१ मार्च रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात किरणने रोहनवर हल्ला चढवला आणि दगडाने त्याचे डोके ठेचून त्याला जागीच ठार केले.

🔥 आई-वडिलांच्या त्रासाचा घेतला बदला?
​आरोपी किरण पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता, त्याने हत्येची धक्कादायक कबुली दिली आहे. मयत रोहन हा घरातील सदस्य आणि आई-वडिलांना सतत त्रास देत होता. या रोजच्या कटकटीला आणि त्रासाला कंटाळूनच मी त्याचा काटा काढला, असा खळबळजनक जबाब किरणने पोलिसांसमोर दिला आहे. एका तरुणाचा अशा प्रकारे शेवट झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
🚨 पोलीस घटनास्थळी दाखल
​घटनेची माहिती मिळताच चोपडा पोलिसांनी तातडीने नारोद गावात धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला रोहनचा मृतदेह पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केला आहे. आरोपी किरण पाटील याला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून त्याच्यावर पुढील कारवाई सुरू आहे.
🔍 पोलिसांकडून सखोल तपास सुरू
​चोपडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम ३०२ (खुनाचा गुन्हा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या हत्येमागे केवळ घरगुती त्रास हेच कारण होते की आणखी काही जुना वाद होता? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. 'राग' आणि 'संताप' माणसाचा कसा घात करू शकतो, याचे हे एक भयानक उदाहरण समोर आले आहे.

बातमी: विशेष प्रतिनिधी, पोलीसराज मीडिया

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या