कापूस शेतकऱ्यांच्या घरी,,आणि हे सरकार म्हणतय शासन आपल्या दारी.

Advertisement

कापूस शेतकऱ्यांच्या घरी,,आणि हे सरकार म्हणतय शासन आपल्या दारी.

 



कापूस शेतकऱ्यांच्या घरी,,आणि हे सरकार म्हणतय शासन आपल्या दारी.



पोलीसराज मिडिया :- संदिप पाटील
 'शेतकऱ्यांच्या शेती मालाच्या भावाची लावलेली वाट आणि शिंदे सरकारचा थाट ही गोष्ट महाराष्ट्रात टोकाला गेलेली आहे.

       2023 हे वर्ष शेतकऱ्यांसाठी सर्वात दुःखदायी ठरले आहे.अवकाळी संकटाला तोंड देता देता शेतकरी मेटाकुटीस आला असून,सरकारने मात्र याच शेतकऱ्याची चांगलीच जिरवण्याचे काम चालू केलेल आहे.

एकीकडे सरकार आणी दुसरीकडे व्यापारी लाॅबी यामुळे शेतकरी मालाला भाव मिळत नाही. शेतकरी भावाच्या आशेने मार्च महीण्यात कापूस विकतात हे कापूस व्यापारी जाणून असल्याने कापूस खरेदीसाठी एप्रिल आणी मे महीण्यातही कापृस भाव पडूनच आहेत.

मे महीण्याच्या शेवटी कापूस लागशड सुरू होईल आणी शेतक-याला पैशांची गरज भासेल हे व्यापारी जाणून आहेत ,कमी भावात कापूस खरेदीसाठी व्यापारी - जिनिंग उत्सूक आहेत पण यात शेतक-यांचा हीताचा काहीच उपायोजना दिसून येत नाही.

कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आज कापूस शेतकऱ्यांच्या घरात भावाच्या प्रतीक्षेत पडुन आहे, पावसाळा तोंडावर आला आहे. शेतक-यांना कापूस कमी भावानेच द्यावा लागेल यात काणताही पर्याय ऊरलेला दिसत नाही.

कोरोनाच्या संकटातून कसाबसा सावरून शेतकरी परिस्थितीशी झगडत उभा राहिला, त्यानंतर निसर्गाची साथ न भेटल्यामुळे तो पूर्णतः कोसळण्याच्या स्थितीत आहे. ज्या सरकारकडे मायबाप या अपेक्षेने पाहत आहे ते सरकार सुद्धा घात करायला पाहत आहे .

काही दिवसांपूर्वीच या सरकारने एक योजना आणली आहे शासन आपल्या दारी, विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कापूस पडला घरी, आणि तरीही हे निर्दयी सरकार म्हणतंय शासन आपल्या दारी.

         तोंडात घास आणि मानात बुक्की अशी अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे,दिग्गज मीडिया मात्र या गोष्टीकडे कानाडोळा करताना दिसून येत आहे,

           नको त्या प्रश्नांना हवा देत महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण अशा बळीराजाच्या पिळवणूकीच्या प्रश्नाकडे मात्र कुठल्याही नेत्याचे अथवा स्टार मीडियाचे लक्ष जाताना दिसून येत नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे.
शेतकऱ्यांची अवस्था भिकाऱ्यासारखी केली असून सरकार तुटपुंजी मदत निवडक शेतकऱ्यांना देऊन या बळीराजाला लाचार करून टाकण्याचे काम करीत आहे.

    शेतकऱ्याच्या पिकाला जर उत्पन्न आणि खर्च या तोडीत योग्य हमीभाव दिला तर तुमच्या मदतीची गरज काय?

शेतकरी संघटना सुद्धा जाणीवपूर्वक या गोष्टीकडे पाठ फिरवतानाचचे चित्र दिसून येत आहे.

        कपाशीच्या विशिष्ट वानांची सध्या जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई करण्यात आलेली आहे. बियाण्यांमध्येही लिंकींग सुरू केली आहे. बियाणे टंचाईमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.पंधरा मे पर्यंत कापूस बियाणे शेतक-यांसाठी उपलब्द व्हायला पाहीजे पण तसे होत नाही.एक जूनला शासन बियाणे ऊपलब्ध करून देते याचा ऊन्हाळी कापूस लागवडीला काय फायदा ?




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या