गुढे येथे जिल्हा अंतर्गत लिंबू हस्त बहार व्यवस्थापन वर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

Advertisement

गुढे येथे जिल्हा अंतर्गत लिंबू हस्त बहार व्यवस्थापन वर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न



 गुढे येथे जिल्हा अंतर्गत लिंबू हस्त बहार व्यवस्थापन वर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न


दि. 30 मे रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा तसेच कृषी विज्ञान केंद्र जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने  गुढे  येथे जिल्हा अंतर्गत लिंबू हस्त बहार  व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र जळगाव येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. हेमंत बाहेती सर यांनी बोर्डो पेस्ट व मिश्रण प्रत्यक्ष तयार करून दाखविले व सदर बोर्डो पेस्ट चे महत्व व फायदे शेतकऱ्यांना पटवून दिले तसेच कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ डॉक्टर किरण जाधव यांनी शास्त्रोक्त पद्धतीने छाटणीचे प्रात्यक्षिक दाखवून छाटणी व हस्त बहार व्यवस्थापन बाबतचे शास्त्रोक्त मार्गदर्शन केले तसेच जिल्हा संसाधन व्यक्ती प्रवीण पाटील यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेविषयी माहिती देऊन लिंबू प्रक्रिया उद्योग उभे करणे बाबत शेतकऱ्यांना आवाहन केले तसेच सदर कार्यक्रमास बी ए एस एफ कंपनीचे प्रतिनिधी विवेक पाटील यांनी कीटकनाशक सुरक्षित फवारणी व पीक वाढ संजीवकांचा बहार व्यवस्थापना मध्ये वापर याविषयी मार्गदर्शन केले तसेच माजी कृषी उपसंचालक अनिल जी भोकरे साहेबांनी शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापना विषयी सखोल मार्गदर्शन करून एकत्रित येऊन गट व फार्मर प्रोडूसर कंपनी स्थापन करून शासनाच्या मदतीने विविध प्रक्रिया उद्योजक उभे करणे बाबत मार्गदर्शन केले तसेच तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांनी सदर कार्यक्रमात लिंबू हस्त बहार व्यवस्थापनाचे महत्त्व तसेच जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा व जैविक खतांचा वापर व महत्त्व तसेच बीज प्रक्रिया, सोयाबीन उगण क्षमता तपासणी तसेच पर्यावरण पुरक जीवन पद्धती विषयी  शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले त्याचबरोबर बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, कीटकनाशके हाताळणी करताना घ्यावयाची काळजी याविषयी  सविस्तर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोखरा समुह सहाय्यक श्रीकांत राजपूत यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल सोनवणे यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी राजेश राठोड, कृषी सहाय्यक संदीप पाटील, सचिन पाटील, सुखदेव गिरी, एसटी राठोड यांनी मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या