बारा दिवसांच्या दुःखात रोजची जेवणावळी तांदळवाडीत दोनशे वर्षापासुन बंदच
तांदळवाडी येथील दोडे गुर्जर समाजातील वरीष्ठ म्हणतात,ही प्रथा आपली पूर्वी पासूनच..
प्रतिनिधी चोपडा :- संदिप पाटील
गुर्जर समाजामध्ये मृत्यू झाल्यानंतर १२ दिवसांचे दिनमान होतात,या काळात तांदळवाडी येथील दुखःच्या घरी भाऊबंदकी बसायला जातात.परंतू तेथे जेवण करीत नाही ही प्रथा फार पूर्वी पासून चालत आलेली आहे असे येथील जूणे लोक सांगतात.काही दिवसांपूर्वीच एक प्रसिद्ध वृत्तपत्रात अशीच बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.ती समाज बांधवांनी वाचली आणी आडगावचे तसेच दोडे संस्थानचे कौतूक केले.आणी आपल्या गावाचीही बातमी प्रसिद्ध व्हायला पाहीजे असा अट्टाहास धरला.
तांदळवाडी हे चारशे वर्षापूर्वी तापी नदीच्या तीरावर वसलेले एक छोटेसे गाव.या गावात गुर्जर बांधवांनी अशा प्रथांचा उगमच होवू दिला नाही.
परंतू ही प्रथा संपूर्ण गुर्जर समाजातून हद्दपार व्हायला पाहीजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.एखाद्या गरिबाच्या घरी कोणाचा मृत्यू झाला तर त्याने काय करावे ,परीस्थीती नाजूक असेल तर कर्ज काढावे का ? कर्ज काढून लोकांना खाऊ घालणे अन्नदान म्हणावे का ? खाणा-यांची संख्या भरपूर असते परंतू कर्ज फेडणा-याची संख्या एकच असते हे समाज बांधवांनी जाणून घ्यायला पाहीजे.अशा अनिष्ट प्रथा बंद झाल्या तर समाज नक्कीच पुढे जाईल यात शंका राहणार नाही.