शहादा येथे भव्य श्री जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन

Advertisement

शहादा येथे भव्य श्री जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन

 


शहादा येथे भव्य श्री जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन


शहादा, जिल्हा नंदुरबार

पल्लवी प्रकाशकर
श्री श्री नारायण पुरम तीर्थ शहादा येथे भव्य श्री विष्णू नारायण मंदिर नारायण भक्ती पंथाचे संस्थापक आचार्य संतश्रेष्ठ श्री लोकेशानंदजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण होत आहे.
नारायण भक्ती पंथाद्वारे विविध भक्ती महोत्सवांचे आयोजन
वर्षभरात करण्यात येत असते.याचाच एक भाग गेल्या चार वर्षांपासून श्री श्री नारायण पुरम तीर्थ ,शहादा द्वारा शहादा नगरीत श्री जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात येत असून महाराष्ट्र,गुजरात ,मध्य प्रदेश, राजस्थान येथील विष्णू भक्त  यात  मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.
यावर्षी दि.20जुन रोजी  भव्य श्री जगन्नाथ रथयात्रा काढण्यात येणार आहे.


*शास्त्र काय म्हणते*?
श्री जगन्नाथ रथयात्रेचे शास्त्रात अनन्य साधारण महत्व मांडलेले आहे.यात जे भक्त रथयात्रेत ध्वजाची सेवा करतो त्याची किर्ती सर्वत्र होते.जे भक्त छत्र आणि पंख्याची सेवा देतात त्यांना राजयोग प्राप्त होतो.जे विष्णू भक्त भंगवंताचे आयुध घेऊन चालतात त्यांचे शत्रू नाहिसे होतात.विशेषता जे भाविक श्री जगन्नाथांचे रथ ओढतात त्यांना शेकडो यज्ञाचे पुण्य फळ प्राप्त होते.
या रथयात्रेचे वैशिष्ट्य असे की, श्री जगन्नाथ जी सदैव माता लक्ष्मी यांच्या समवेत असतात परंतु,या रथयात्रेत भगवान जगन्नाथजी बंधू बलराम आणि बहिण सुभद्रा यांच्या सोबतीने नगर भ्रमण करतात.जे अबाल -वृध्द,अपंग  भक्त प्रत्यक्ष मंदिरात जाऊन भंगवंताचे दर्शन लाभ घेऊ शकत नाहीत त्या भक्तांना भेटण्यासाठी भगवान श्री जगन्नाथ स्वतः आपल्या भावंडासमवेत भक्तांच्या भेटीला रथात बसून नगर भ्रमण करतात.
श्री श्री नारायण पुरम तीर्थ शहादा द्वारा श्री जगन्नाथ रथयात्रेची सुरुवात श्री सप्तशृंगी मातेच्या मंदिरापासून एस.बी.आय.चौक ,बस स्थानक,गांधी पुतळा , डोंगरगाव रस्त्यावरील अहिंसा चौकातून पुढे दादावाडी जवळ समाप्त होईल.शहादा शहरातील सर्व भक्तांनी सहभागी होऊन श्री जगन्नाथ रथयात्रेचे दर्शन लाभ घ्यावे असे आवाहन श्री नारायण भक्ती पंथ शहादा द्वारा करण्यात आले आहे.
फोटो.......
रथयात्रेच्या पुर्वतयारी ला वेग .....
रथाची सजावट करताना भाविक...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या