मंगळग्रह मंदिर देवस्थान मार्फत कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात "वॉटर बॉटल" वाटप

Advertisement

मंगळग्रह मंदिर देवस्थान मार्फत कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात "वॉटर बॉटल" वाटप

मंगळग्रह मंदिर देवस्थान मार्फत कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात "वॉटर बॉटल" वाटप



चोपडा दि.११(प्रतिनिधी महेश शिरसाठ)

जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्य साधत अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर देवस्थान मार्फत चोपडा शहरातील कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात आदिवासी विद्यार्थींनींना" वॉटर बॉटल" वाटप करून खऱ्या अर्थाने आदिवासी दिवस साजरा केला .
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मंगळग्रह मंदिर देवस्थानचे अध्यक्ष डिगंबर महालेसर व संस्थेचे विश्वस्त दिलीप बहिरम यांनी आदिवासी विद्यार्थ्यांची निकड बघून डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहू.उद्देशिय संस्था संचलित कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात  "वॉटर बॉटल" देऊन मदतीचा हात दिला. त्या वॉटर बॅग वसतीगृह अध्यक्ष महेश पी.शिरसाठ यांच्या शुभहस्ते विद्यार्थींनींना  देण्यात आल्या.गरिब,निकडवंत विद्यार्थींना मदतीचा हात देऊन खऱ्या अर्थाने जागतिक आदिवासी दिवस साजरा झाल्याचे मत महेश शिरसाठ यांनी व्यक्त करून मंगळग्रह मंदिर देवस्थानचे आभार मानले.यावेळी अधिक्षिका कावेरी कोळी, सचिव संजय शिरसाठ, कर्मचारी भिमराव साळूंके व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या