चोपडा ग्रामीण पोलिसांची दमदार कारवाई, आरोपीला अटक करून त्याच्याकडील ८० हजार रूपये किमतीची गावठी बंदूक जप्त

Advertisement

चोपडा ग्रामीण पोलिसांची दमदार कारवाई, आरोपीला अटक करून त्याच्याकडील ८० हजार रूपये किमतीची गावठी बंदूक जप्त

 चोपडा ग्रामीण पोलिसांची दमदार कारवाई, आरोपीला अटक करून त्याच्याकडील ८० हजार रूपये किमतीची गावठी बंदूक जप्त

आरोपी कडंन जप्त केलेली गावठी बनावटी बंदूक


चोपडा । प्रतिनिधी संदिप पाटील

गुन्हेगारी करण्यासाठी हातात  गावठी बनावटीची बंदूक (रायफल) घेऊन दुचाकीवरून रात्री अंधारात फिरणाऱ्या दोघा संशयितांना गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकाने हटकले असता, त्यांना पाहून दुचाकीवर मागच्या शीटवर हातात बंदूक ( रायफल) घेऊन बसलेल्या संशयिताने हातातील बंदूक फेकून अंधारात उडी मारून फरार झाला तर त्याचा दुसरा साथीदार दुचाकी चालकाला पोलिसांनी अटक करून दुचाकीसह गावठी बनावटीची बंदूक (रायफल) जप्त केल्याची घटना दि. ११ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास गलवाडे ते बुधगाव रस्त्यावर घडली.

शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडे येथील रमेश मालसिंग पावरा व कांतीलाल दुरसिंग पावरा हे दोघेजण दि. ११ ऑगस्ट रोजी शुक्रवारी रात्री ११ वाजता शाईन कंपनीच्या दुचाकीवर हातेड ते बुधगाव जाणाऱ्या रस्त्यावर गावठी बनावटीची बंदूक (रायफल) हातात घेऊन गुन्हेगारी करण्याच्या उद्देशाने जात असतांना ग्रामीण पोलीस स्टेशन शिंगाणे करीत आहेत.

कर्मचारी पोहेकॉ. लक्ष्मण शिंगाणे, पोहेकॉ. राकेश पाटील हे त्याच रस्त्यावर गस्त घालत असतांना त्यांनी संशयित दुचाकीस्वारांना हटकले असता दुचाकीच्या मागच्या शीटवर गावठी बनावटीची बंदूक ( रायफल) हातात घेऊन बसलेला दुसरा संशयित कांतीलाल दुरसिंग पावरा याने पोलिसांना पाहून हातातील बंदूक फेकून अंधारात फरार झाला तर दुचाकी चालक रमेश मालसिंग पावरा याचेकडून ८०,००० किंमतीची गावठी बनावटीचा साडेचार फुट लांबीची बंदूक तसेच ६०,००० किंमतीची शाईन हिरो होंडा कंपनीची बिना नंबर प्लेटची अशी एकूण १,४०,००० हजाराचा मुद्देमाल जप्त करून अटक करण्यात आली. पोहेकॉ. राकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशनला रमेश पावरा व कांतीलाल पावरा रा. महादेव दोंदवाडे (ता. शिरपूर जि. धुळे ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.लक्ष्मण शिंगणे तपास करीत आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या