चार तालुक्यातील गाव न गाव पिंजून, १८ दिवसात मृतदेहाची ओळख पटवून अट्टल आरोपींना अटक
*विदर्भ प्रमुख - बबनराव इंगळे*
यवतमाळ प्रतिनीधी :- लाडखेड पोलिस ठाण्यातील मोझर येथे एका शेतातील विहिरीत युवकाचा मृतदेह आढळला . त्याच्या हातावरचा टॅटू व गोंदलेले नाव हा एवढाच सुगावा पोलिसांकडे होता . मृतदेह मिळून १८ दिवस लोटले तरी काहीच मिळत नव्हते .अनोळखी मृतदेहाच्या हातावर हनुमानाचा टॅटू गोंदलेला होता . तसेच त्याच्या हातावर शंकर - निकिता असे नाव होते . यासोबत मृताच्या खिशात तंबाखू पुडी सापडली . या एवढ्या सुगाव्यावरून पोलिसांनी १८ दिवसात अनोळखी युवकाच्या मृताची ओळख पटविली . त्यासाठी सलग संपूर्ण यंत्रणा कामाला लागली.
प्रत्येक ' शंकर'च्या घरी पोहोचले पोलिस
खुनाचा छडा लावण्याकरता प्रथम मृतदेहाची ओळख पटविणे आवश्यक होते . यासाठी सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी पथक तयार केले . एलसीबीचे सहायक निरीक्षक संतोष मनवर , गणेश वनारे यांचे दोन पथक , एसडीपीओ पथकाचे सहायक निरीक्षक सुगत पुंडगे , लाडखेड ठाणेदार स्वप्निल निराळे या सर्वांना कामाला लावले . शंकर- निकिता या जोडीचा शोध घेण्यासाठी यवतमाळ , आर्णी , दारव्हा , घाटंजी या तीन तालुक्यातील सर्व रेशन कार्ड , मतदार यादी यातून फक्त शंकर नावाची वेगळी यादी करत त्या प्रत्येकाच्या घरी पोलिसांनी चौकशी केली .
शंकर व निकिता या नावाच्या जोडीचा शोध सुरू झाला . या १८ दिवसांत पोलिसांनी यवतमाळ , आर्णी , घाटंजी , दारव्हा या चार तालुक्यांतील गावं पिंजून काढली . या दीर्घ प्रयत्नाला यश मिळाले . मृतदेहाची ओळख पटली . त्यासोबतच मारेकरी कोण हेही पुढे आले . शेजारीच . जावयाने राहणाऱ्या दारुड्या मेव्हण्याचा गळा घोटून खून केला . नंतर मृतदेह पोत्यात भरून दगडासह विहिरीत टाकल्याचे पुढे आले आहे . शंकर चंद्रभान शेलकर ( ३५ ) रा . शास्त्रीनगर झोपडपट्टी आर्णी असे मृत युवकाचे नाव आहे शंकर हा त्याच्या बहिणीच्या घरा शेजारी झोपडी बांधून राहत होता . दारू पिण्यासाठी गवंडी काम करणे एवढाच उद्योग शंकर करत होता . दारू पिल्यानंतर तो एखाद्या जनवाराप्रमाणे वागत असते . याच त्रासाला कंटाळून त्याची पत्नी निकिता त्याला सोडून माहेरी निघून गेली . त्यामुळे शंकरचा त्रास अधिकच वाढला . शंकरच्या बहिणीला मोठी मुलगी होती . त्याचेही भान शंकरला राहत नसे , अतिशय घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत होता . हीबाब शंकरचे जावई रमेश मेटकर यांना खटकली . शंकरचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी मोझर येथून एका मित्राला बोलावले . शुक्रवार २१ जुलै रोजी शंकरला दारू पिण्याच्या बहाण्याने भांबराजा येथे आणले . तेथे त्याला शुद्ध हरपेपर्यंत दारू पाजली . नंतर त्याचा शेल्याने ग़ळा आवळून खून केला . शंकरचा मृतदेह घेऊन रमेश व त्याचा मित्र राजेश हे दोघे मोझर शेतशिवारात आले . रात्री ९ वाजताच्या दरम्यान मृतदेह एका पोत्यात भरला त्यात दगड टाकले , ताराने बांधून हे पोते विकास पांडे यांच्या शेतातील विहिरीत फेकले . हा घटनाक्रम उघड करण्यासाठी पोलिसांना रात्रीचा दिवस करावा लागला . याप्रकरणी रमेश विठ्ठल मेटकर ( ४५ ) रा . आर्णी , राजेश सुभाष गडमडे ( ३१ ) रा . मोझर ( ई . ) यांना पोलिसांनी अटक केली .
*प्रत्येक ' शंकर'च्या घरी पोहोचले पोलिस*
खुनाचा छडा लावण्याकरता प्रथम मृतदेहाची ओळख पटविणे आवश्यक होते . यासाठी सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी पथक तयार केले . एलसीबीचे सहायक निरीक्षक संतोष मनवर , गणेश वनारे यांचे दोन पथक , एसडीपीओ पथकाचे सहायक निरीक्षक सुगत पुंडगे , लाडखेड ठाणेदार स्वप्निल निराळे या सर्वांना कामाला लावले . शंकर- निकिता या जोडीचा शोध घेण्यासाठी यवतमाळ , आर्णी , दारव्हा , घाटंजी या तीन तालुक्यातील सर्व रेशन कार्ड , मतदार यादी यातून फक्त शंकर नावाची वेगळी यादी करत त्या प्रत्येकाच्या घरी पोलिसांनी चौकशी केली .
शेलू शेंदूरसणी येथे भेटली मृताची पत्नी*
शंकरच्या शोधात शोधपत्रिका घेऊन पोलिस आर्णी तालुक्यातील शेलू शेंदूरसणी येथे पोहोचले . त्या गावातील जावाई शंकर असून त्याच्या पत्नीचे नाव निकिता असल्याची माहिती मिळाली . शंकरच्या मृतदेहाचा फोटो घेऊन पोलिस थेट त्याच्या पत्नीजवळ पोहोचले तिने पतीच्या हातावरील गोंदलेली हनुमानाची प्रतिमा , गोंदलेले नाव , तंबाखूची पुडी यावरून शंकरची ओळख पटविली . शंकरला ९ महिन्यांची मुलगी व सहा वर्षांचा मुलगा आहे . पतीच्या त्रासाला कंटाळून निकिता माहेरी वडिलांकडे राहत होती . येथेच पोलिसांचा तपास पूर्ण झाला . २० दिवसांच्या अथक परिश्रमानंतर हे यश मिळाले .
*गुन्ह्याच्या तपासासाठी यांनी घेतले परिश्रम*
पोलिस अधीक्षक डॉ . पवन बनसोड , अपर अधीक्षक पीयूष जगताप , सहायक पोलिस अधीक्षक अदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात लाडखेड ठाणेदार स्वप्नील निराळे , उपनिरीक्षक दुर्गालाल टेंभरे , अनिल सांगळे , प्रकाश रत्ने , नासीर शेख , विनोद वानखडे , उमेश शर्मा , पंकज दोनाडकर , शिवाजी शिंदे , विठ्ठल कोपनर , विलास राठोड , जयंत शेंडे , मयूर तेल्लेवार , योगेश नागदिवे , स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने , सहायक निरीक्षक गणेश वनारे , संतोष मनवर , विवेक देशमुख , सायबर सेल प्रभारी विकास मुंडे , जमादार सैयद साजीद , अजय डोळे , मिथून जाधव , किशोर झेंडेकर , बबलू चव्हाण , अमित झेंडेकर , विनोद राठोड , सहायक निरीक्षक सुगत पुंडगे , उपनिरीक्षक चंदन वानखेडे , बदरके , रत्नपारखी , जमादार प्रमोद इंगोले , कृष्णा साखरकर , अमित गायकी यांनी गुन्ह्याचा तपास केला . या सर्वांनी सलग १८ दिवस चार तालुक्यातील गावनगाव पिंजून काढले .


0 टिप्पण्या