तापी नदी पुलावर मोठमोठी खड्डे,
दोन जण खड्ड्यांमुळे पडले पण सुदैवाने वाचलेपोलीसराज मिडिया :- संदिप पाटील
अमळनेर धरणगाव आणि चोपडा या तीन तालुक्यांच्या सीमेवरचा तापीनदीला जोडणारा पूल महत्वाचा मानला जातो.हा पुल इंग्रज काळातला असून सुमारे पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ ह्या पुलाला झालेला आहे.या पुलाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा पुल जपींग पुल म्हणून ओळखला जातो.
तीन तालुक्यांना जोडणारा हा तापी नदीवरचा पूल असून त्यावरची २४ तास रहदारी असताना देखील या पुलावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने पुलाची अक्षरक्ष चाळणी झाली आहे. काही वर्षांपूर्वी ह्या पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले होते. काही दिवसातच त्या पुलाची दुरवस्था झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्यानंतर देखील सार्वजनिक बांधकाम विभाग का दुरुस्ती करत नाही असा प्रश्न चोपडा व अमळनेर धरणगाव तालुक्यातील प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
दुर्दैव असे की मागील दोन म्हणण्यानुसार तापी पुलावर मोठमोठाली खड्डे पडले असून याकडे सामाजिक विभागाचे दुर्दैव होतांना दिसत आहे.आज दि. ३ सप्टेंबर रोजी दोन दुचाकी वाहनधाधक खड्डे टाळण्याच्या नादात पुलावर पडले असून त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही .याकडे सामाजिक विभागाचे हटकून दुर्लक्ष होतांना दिसत आहे .मागील एक महीण्यापूर्वी चोपडा सामाजिक विभागाकडे मोबाईल वर फोटो पाठवले होते त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली असून कुठलीही ठोस कार्यवाही केली नाही याकडे राजकीय,सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्ष घालावे अशी जोरदार मागणी सुरू आहे.

