चोपडा तालुका ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी श्री राधेश्याम पाटील व सचिवपदी श्री मनोहर पाटील यांची निवड
चोपडा प्रतिनिधी :- संदिप पाटील
चोपडा तालुक्यातील सार्वजनिक ग्रंथालय संघांच्या अध्यक्षपदी श्री राधेश्याम गोपाल पाटील ( खर्डी ) ,व सचिवपदी श्री मनोहर गोरख पाटील ( वटार) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडीप्रसंगी सभेचे अध्यक्ष म्हणून जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री सतिष डी पाटील होते तर प्रमुख उपस्थिती उपाध्यक्ष श्री रविंद्र पाटील, श्री संजय पाटील, श्री रावसाहेब पाटील तसेच जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकाऱी होते .सभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री नरेंद्र पाटील ( लोणी ) यांनी केले. तसेच या निवड प्रसंगी चोपडा तालुक्यातील सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय पदाधिकाऱी व ग्रंथालय कर्मचारी उपस्थितीत होते. कार्यकारिणी खालील प्रमाणे
1 श्री राधेश्याम गोपाल पाटील खर्डी, अध्यक्ष
2 श्री मनोहर गोरख पाटील वटार, सचिव
3 श्री किरण विठ्ठल बडगुजर अकुलखेडे, उपाध्यक्ष
4 श्री चंद्रकांत रामसिंग बाविस्कर गोरगावले, कार्याध्यक्ष
5 श्री गोपाल शरद दांडेकर चोपडा, सहसचिव
6 श्री देवानंद लक्ष्मण पाटील निमगव्हाण, कोषाध्यक्ष
7 श्री केदार गंगाराम पाटील घाडवेल, सदस्य
8 श्री विठ्ठल पुंडलिक पाटील घोडगाव, सदस्य
9 श्री अनिस अहमद गयासुद्दीन चोपडा, सदस्य
यांची निवड बिनविरोध व एकमताने करण्यात आली.

0 टिप्पण्या