श्री. गजानन तांदलवाडी वि. का. सह. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न....मात्र बँकेकडून थकबाकीदारांना नोटीसा

Advertisement

श्री. गजानन तांदलवाडी वि. का. सह. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न....मात्र बँकेकडून थकबाकीदारांना नोटीसा

 श्री. गजानन तांदलवाडी वि. का. सह. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न....मात्र बँकेकडून थकबाकीदारांना नोटीसा


चोपडा प्रतिनिधी :- संदिप पाटील

श्री गजानन तांदलवाडी वि.का. सह सोसा. तांदलवाडी ता. चोपडा जि. जळगांव या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दि.३ सप्टेंबर रोजी संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे चेअरमन श्री दिपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सकळी ९ वाजता घेण्यात आली.

या वार्षिक सर्वसाधारण सभेत
मागील वार्षिक सर्व साधारण सभेचे प्रोसिडींग वाचून कायम करणे. २) सन २०२२ ते २०२३ या वर्षाचे आर्थिक पत्रके (तेरीज, ताळेबंद, नफा - तोटा पत्रक ) वाचून मंजुर करणे.
३) सन २०२३ - २४ या वर्षाकरीता म. व्यवस्थापक समिती यांनी जमा खर्चाचे तयार केलेले अंदाजपत्रक वाचून मंजुर करणे. ४) बाहेरील कर्ज उभारणेचा अधिकार व्यवस्थापक समितीस देणे.
५) बँकेच्या व इतर महत्वाच्या तसेच सरकारी कागदपत्रांवर सहया करण्याचा अधिकार व्यवस्थापक समितीस देणे. ६) सन २०२२ - २३ या वर्षाच्या लेखा परिक्षणाचा अहवाल व दोष दुरस्ती अहवाल वाचून मंजुर करणे व दोष - दुरस्ती अहवाल मंजुरीसाठी पाठविणे.
७) सन २०२३ - २४ चे लेखा परिक्षणासाठी लेखा परिक्षकांची नेमणूक करणे.
८) सभेस अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणे.
९) उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेच्या संचालक मंडळ व त्यांच्या नातेवाईकांना दिलेले कर्ज व वसुली पत्रकाची नोंद घेणे.१०) केंद्र शासनाने पुरुस्कृत केलेले प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्थाचे आदर्श उपविधी स्विकारणे बाबत या वरील दहा विषयांवर चर्चा करून विषयास मंजूरी देण्यात आली.

संस्थेच्या पोटनियम केंद्र शासनाच्या निर्णयानुसार दुरूस्ती करण्यात आली असून पीक कर्जाची मर्यादा १०% वरून २५% टक्के करण्यात आली असून ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची बाब आहे .यात केंद्र शासनाने पुरुस्कृत केलेले प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्थांचे  आदर्श उपविधी करणे म्हणजेच संस्थेत १५१ व्यवसाय सुरू करण्यासाठी दुरूस्ती करण्यात आली असून याच्यावर चर्चा करण्यात आली.भविष्यात संस्थेमार्फत व्यवसाय सुरू होतील आणी गावातील तरूणांना रोजगार उपलब्ध होतील अशी माहीती दिपक पाटील यांनी दिली.

केंद्र शासनाने दि.०५ जानेवारी, २०२३ रोजीचे पत्रान्वये प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांच्या आदर्श उपविधीमध्ये १ ते १५१ विविध व्यवसायांचा अंतर्भाव करणेबाबत आणि प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांची कर्ज उभारण्याची मर्यादा स्वनिधीच्या २५ पट करणेबाबत आदेशित केलेले आहे. सबब आपल्या संस्थेच्या उप-विधीत यासोबत जोडलेल्या विवरण पत्रक १ यात दर्शविलेल्या सुधारणा करणे आवश्यक आहे आणि त्या आपल्या संस्थेच्या हिताच्या दृष्टीने योग्य आहेत,

म्हणून, आपल्या संस्थेच्या हिताच्या दृष्टीने ह्या सुधारणा विचारात घेण्याची महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ यातील नियम १३ (१) खालील  आदेश देत आहे की, ही नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत, आपल्या संस्थेच्या उप- विधीत सुधारणा करण्यासाठी आपण आवश्यक ती उपाययोजना करावी असे आदेश मा.उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांच्याकडील पत्राव्दारे कार्यवाही करण्यात येणार आहे.

तसेच संस्थेच्या थकबाकीदार यांची विचारणा केल्यावर संस्थेच्या अध्यक्षांनी बँकेमार्फत थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत आणी कर्जाची वसुली लवकरच पूर्ण होईल अशी माहीती यावेळी दिली. यावेळी संस्थेचे संचालक व सभासद उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या