133 विद्यार्थ्यांची जळगाव जिल्ह्यात भारत टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात संपन्न

Advertisement

133 विद्यार्थ्यांची जळगाव जिल्ह्यात भारत टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात संपन्न

 133 विद्यार्थ्यांची जळगाव जिल्ह्यात भारत टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात संपन्न

     जळगाव ( प्रतिनिधी ) संदिप पाटील 

 जळगांव जिल्ह्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित व भविष्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी यासाठी यजुमेट अकॅडमी आयोजित भारत टॅलेंट सर्च परीक्षा यावर्षी प्रथमच राज्यभर घेण्यात आली.



         जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात विवेकानंद विद्यालय  व अंमळनेर तालुक्यात स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल या दोन केंद्रावर परीक्षा अतिशय सुरळीतपणे व उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाली.

        देशातील नवीन शैक्षणिक धोरणावर संपन्न होणारी ही पहिलीच परीक्षा अर्थात भारत टॅलेंट सर्च परीक्षा विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावणारी ठरणार आहे.

       राज्यस्तरावरील विजेत्यां गुणवंत विद्यार्थ्यांना *इसरो, राष्ट्रपती भवन, विधान भवन* अशी शैक्षणिक मोफत सहल घडविण्यात येणार आहे. तसेच *जिल्हा स्तरावरील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान* करण्यात येणार आहे.प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे.

*विवेकानंद विद्यालय चोपडा* 

 चोपडा तालुक्यात या परीक्षेसाठी विवेकानंद विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय ,पंकज विद्यालय येथील पहिली ते आठवीचे येथील एकूण 113 विद्यार्थी परीक्षेत बसलेले होते. तर

    

*अमळनेर येथील केंद्रावर*

    जिल्हा परिषद शाळा मारवड व अमळनेर मधील वेगवेगळ्या शाळांचे एकूण वीस विद्यार्थी  परीक्षेत प्रविष्ठ झाले होते.


संपूर्ण जिल्ह्याचे परीक्षेचे कामकाज विभागप्रमुख गजानन उदार नाशिक, जिल्हा समन्वयक राकेश विसपुते यांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांभाळले. सदर परीक्षेसाठी मुख्याध्यापक नरेंद्र भावे, परीक्षा निरीक्षक म्हणून कल्पना पाटील, केंद्रप्रमुख राहुल दिलीप पाटील यांच्यासह दिलीप मोरे, निलेश पाटील, जागृती पवार ,अनुज बडगुजर ,प्रमोद वारुळे ,आरती माळी, मेघना बन्सोले या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. या नावीन्यपूर्ण नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित परीक्षेचे विद्यार्थी व पालक वर्गाकडून समाधान पूर्वक चांगल्या प्रतिक्रिया प्राप्त झाल्यात. पुढच्या वर्षी जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घ्यावा असे आयोजकांतर्फे आव्हान करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या