प्रशासनाकडून आश्वासनाचे गाजर की ठोस कारवाई? 'माऊली प्लाझा' प्रकरणी पाटील दाम्पत्याचे उपोषण मागे!

Advertisement

प्रशासनाकडून आश्वासनाचे गाजर की ठोस कारवाई? 'माऊली प्लाझा' प्रकरणी पाटील दाम्पत्याचे उपोषण मागे!

प्रशासनाकडून आश्वासनाचे गाजर की ठोस कारवाई? 'माऊली प्लाझा' प्रकरणी पाटील दाम्पत्याचे उपोषण मागे!
जळगाव:पोलीसराज मिडियम भुसावळ येथील बहुचर्चित 'माऊली प्लाझा' इमारतीमधील बेकायदेशीर बांधकाम आणि त्यातील भ्रष्ट कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुकारलेले बेमुदत उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. 'पोलीसराज मीडिया' ने या प्रकरणाचा सातत्याने केलेला पाठपुरावा आणि सामाजिक संघटनांच्या वाढत्या दबावामुळे प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.

प्रजासत्ताक दिनी पुकारला होता एल्गार
​२६ जानेवारी २०२६ रोजी देशाच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्री. प्रमोद जगन्नाथ पाटील आणि सौ. संगीता प्रमोद पाटील या दाम्पत्याने जळगावच्या जी.एस. ग्राउंडवर (जिल्हाधिकारी कार्यालयासमोर) उपोषण सुरू केले होते. भुसावळमधील 'माऊली प्लाझा' येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई व्हावी आणि या गैरव्यवहारात सामील असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावेत, ही त्यांची प्रमुख मागणी होती.
सामाजिक संघटनांची लाभली साथ
​या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता, अखिल भारतीय युवा गुर्जर महासभेचे प्रदेशाध्यक्ष श्रीरामबापूसाहेब पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपोषणस्थळी धाव घेतली. त्यांनी या लढ्याला जाहीर पाठिंबा देत, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या यंत्रणेचा निषेध केला. "जोपर्यंत दोषी गजाआड जात नाहीत, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

'पोलीसराज मीडिया'चा आक्रमक पाठपुरावा
​या संपूर्ण प्रकरणात 'पोलीसराज मीडिया'ने पीडित दाम्पत्याची बाजू लावून धरली होती. प्रशासनातील भ्रष्ट साखळी उघड करण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण वार्तांकनामुळे हा प्रश्न राज्यभर चर्चेत आला. मीडियाच्या या भूमिकेमुळेच प्रशासकीय यंत्रणेला नमते घ्यावे लागले आणि आंदोलकांशी चर्चेसाठी पुढाकार घ्यावा लागला.
नेमकी मागणी काय?
• ​माऊली प्लाझामधील सर्व बेकायदेशीर बांधकामे त्वरित जमीनदोस्त करावीत.
• ​अनधिकृत कामांना चुकिचीसंमती देणाऱ्या संबंधित विभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत.
• ​गेल्या अनेक दिवसांपासून न्यायासाठी भटकणाऱ्या पाटील दाम्पत्याला न्याय मिळावा.

 प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासन (ऊद्या लेखी पत्र मिळणार आहे) आणि चौकशीच्या ग्वाहीनंतर उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. मात्र, जर ठराविक कालावधीत कारवाई झाली नाही, तर हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

प्रमोद पाटील परिवारातर्फे जाहीर आभार व कृतज्ञता व्यक्त
​भुसावळ परिसरातील विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी नुकताच पाटील परिवाराला आपला खंबीर पाठिंबा दर्शवला. कंडारीचे माजी सरपंच व गुर्जर समाजाचे युवानेते श्री. सूर्यभान विश्राम पाटील, समाजसेवक चंद्रशेखर दोडे, भुसावळ काँग्रेसचे युवा तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील आणि गोपीचंद छन्नू चौधरी यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून आपली भूमिका मांडली.
​तसेच माऊली प्लाझाचे रहिवासी सौ. सोनाली सुदाम शिवरामेसुदाम शिवरामे, मनसे विद्यार्थी सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष जयेश पाटील, ईश्वर पवार, आणि छावा संघटना व राजपूत करणी सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष श्री. संदीपराणा पाटील या सर्व मान्यवरांनी जाहीर पाठिंबा देत प्रशासकीय स्तरावर प्रश्नांची तड लावण्यासाठी पाटील परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून लढा दिला. या कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या या सर्व सहकाऱ्यांचे व पदाधिकाऱ्यांचे प्रमोद पाटील परिवारातर्फे 'पोलिसराज मीडिया'च्या माध्यमातून मनापासून आभार मानण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या