प्लॉट क्र. ९ मधील अनधिकृत बांधकाम व पार्किंग रस्ता गायब केल्याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून तात्काळ अटकेबाबतचे निवेदन

Advertisement

प्लॉट क्र. ९ मधील अनधिकृत बांधकाम व पार्किंग रस्ता गायब केल्याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून तात्काळ अटकेबाबतचे निवेदन

प्लॉट क्र. ९ मधील अनधिकृत बांधकाम व पार्किंग रस्ता गायब केल्याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून तात्काळ अटकेबाबतचे निवेदन

पोलीसराज मिडिया - संदिप पाटील

भुसावळ तालुक्यातील जामनेर रोड परिसरातील सर्वे नं. 115/1/अ, प्लॉट नं. 09 वरील माऊली प्लाझा इमारतीच्या बांधकामात गंभीर अनियमितता व मंजूर नकाशाचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट दिल्यामुळे श्री प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे.

सविस्तर वृत्तअसे की भुसावळ येथी (स.क्र. ११५/१/अ, प्लॉट क्र.९) प्लॉटला संबंधीत उपविभागीय कार्यालय भुसावळ व नगररचना विभाग जळगांव विभागाकडून ऑक्युपेशन सर्टिफिकेट (ओ.सी.) देण्यात आलेले असून मंजूर नकाशानुसार बांधकाम करण्यात आलेले नाही. ही स्पष्ट अनियमितता असून त्यात संबंधीत अधिकारी तसेच विल्डिंगमालक यांच्या संगनमताने हे बेकायदेशीर बांधकाम करुन मंजूर करण्यात आले आहे असे अर्जदाराने पत्रात नमुद केले आहे.

या बेकायदेशीर बांधकामामुळे परिसरात पार्कीग संदर्भात गंभीर अडचणी निर्माण झाल्या मुळे व पत्र क्र. १४२ च्या नमूद बाबींचे उलंघन तसेच या प्रकरणा विरोधात अर्ज दाखल केल्यानंतर बिल्डिंगमालक व त्यांची मुले व ५-६ टपोरी मित्र मंडळी दिवसरात्र, रात्री-अपरात्री त्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे माझ्या घराबाहेर येवून गलीच्छ अपशब्दांचा वापर करुन मला व परिवारास जीवे ठार मारण्याच्या धमकी देतात. या संदर्भात श्री प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी बाजारपेठ पोलिसस्टेशन, भुसावळ येथे रितसर एन.सी लेखी तक्रार दाखल केली आहे व त्याची प्रत सोबत जोडली आहे. याबाबत मला तसेच परिवाराततील सर्व सदस्यांना मानसिक त्रास, शाररिक इजा किंवा अपघात झाला / अपघात घडवून आणला तर संबंधीत अधिकारी, बिल्डिंगमालक व त्यांची मुले व ५-६ टपोरी मित्र मंडळी याना जबाबदार धरून दोषी ठरवावे. तसेच या प्रकरणातील संबंधीत जबाबदार अधिकारी विरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करुन सखोल चौकशी करण्यात यावी, ही नम्र परंतू ठाम मागणी आहे. जर या प्रकरणात योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्यात आली नाही तर मी दि. २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव समोर सहपरिवार उपोषणास बसणार आहे. तसेच या मागणीचे समाधान होत नाही तोपर्यंत सर्व्हे क्र. ११५/१/अ, प्लॉट क्र.९ या जागेवर कोणत्याही प्रकारचा पुर्नविकास (रिव्हाईज प्लॅन), रिव्हायझन अथवा मंजूर प्रक्रिया राबवू नये असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय यांना दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या