भुसावळ: 'माऊली प्लाझा'मधील बेकायदेशीर बांधकामावरून वाद पेटला; २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

Advertisement

भुसावळ: 'माऊली प्लाझा'मधील बेकायदेशीर बांधकामावरून वाद पेटला; २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

भुसावळ: 'माऊली प्लाझा'मधील बेकायदेशीर बांधकामावरून वाद पेटला; २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

भुसावळ (प्रतिनिधी): तालुक्यातील जामनेर रोड परिसरातील सर्वे नं. ११५/१/अ, प्लॉट नं. ०९ वरील 'माऊली प्लाझा' या इमारतीच्या बांधकामात गंभीर अनियमितता आणि मंजूर नकाशाचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत, श्री. प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी संबंधित अधिकारी व इमारत मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव समोर सहपरिवार उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


नेमके प्रकरण काय?

​प्रमोद पाटील मा.जिल्हाधिकारी  यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माऊली प्लाझा इमारतीला उपविभागीय कार्यालय व नगररचना विभाग, जळगाव यांच्याकडून 'ऑक्युपेशन सर्टिफिकेट' (OC) मिळाले असले, तरी प्रत्यक्ष बांधकाम मंजूर नकाशानुसार झालेले नाही. अधिकारी आणि इमारत मालक यांच्या संगनमताने हे बेकायदेशीर बांधकाम पूर्ण करण्यात आले असून, यामुळे परिसरात पार्किंगच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.

जीवे मारण्याच्या धमक्या आणि पोलिसात तक्रार

​या बेकायदेशीर कामाविरोधात आवाज उठवल्यामुळे इमारत मालक, त्यांची मुले आणि काही समाजकंटक रात्री-अपरात्री घराबाहेर येऊन शिवीगाळ करत असून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात रितसर एनसी (NC) दाखल केली आहे. "माझ्या कुटुंबाला काहीही इजा झाल्यास संबंधित अधिकारी आणि इमारत मालक जबाबदार असतील," असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

प्रमुख मागण्या:

  • दोषींवर कारवाई: नियमबाह्य बांधकाम मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि इमारत मालकावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
  • नकाशा प्रक्रिया रोखणे: जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत सदर जागेवर कोणत्याही प्रकारचा पुनर्विकास (Revised Plan) किंवा नवीन मंजुरी प्रक्रिया राबवू नये.
  • सखोल चौकशी: बांधकामातील अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना अटक करावी.
  • ​"प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अन्यथा प्रजासत्ताक दिनी मला सहपरिवार उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल."

    प्रमोद जगन्नाथ पाटील (तक्रारदार)


    ​या तक्रारीमुळे भुसावळमधील महसूल आणि नगररचना विभागात खळबळ उडाली असून, प्रशासन आता यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या