चोपडा नगरपरिषदेच्या विषय समित्यांची बिनविरोध निवड; नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील स्थायी समितीच्या सभापती
चोपडा (प्रतिनिधी):संदीप पाटील
चोपडा नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड सोमवारी (दि. १९) अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार श्री. भाऊसाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत सर्व निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.
विशेष सभेचे आयोजन
नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांवरील सदस्यांचे नामनिर्देशन आणि सभापती निवडीसाठी सोमवारी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील, उपाध्यक्ष श्री. पंकज सुरेश बोरोले, मुख्याधिकारी श्री. रामनिवास झंवर यांच्यासह गटनेते श्री. योगेंद्र (पियुष) चौधरी, श्री. रमाकांत ठाकूर, श्री. गजेंद्र जैस्वाल, श्री. हितेंद्र देशमुख व एकूण ३४ सन्माननीय नगरसेवक उपस्थित होते.
नवनिर्वाचित सभापतींची नावे खालीलप्रमाणे:
बिनविरोध निवडीने जल्लोष
समितीचे व सभापतींचे नाव
१.स्थायी समिती सौ. पाटील नम्रता सचिन (नगराध्यक्षा), २.सार्वजनिक बांधकाम समिती श्री. पठाण हुसेनखा अयुबखा ,३.शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती श्री. पाटील अमोल साहेबराव, ४.स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती श्री. शिंदे रमेश ग्यानोबा ,५.पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती श्री. चौधरी किशोर रघुनाथ ,६.नियोजन व विकास समिती श्री. बोरोले पंकज सुरेश (उपाध्यक्ष) ,७.महिला व बालकल्याण समिती सौ माझी देवयानी पवन.
बिनविरोध निवडीने जल्लोष
नियमानुसार, नगरपरिषदेच्या अध्यक्षा या स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापती तर उपाध्यक्ष हे नियोजन व विकास समितीचे पदसिद्ध सभापती म्हणून घोषित करण्यात आले. मुख्याधिकाऱ्यांमार्फत प्राप्त झालेले सर्व प्रस्ताव पीठासीन अधिकाऱ्यांनी मंजूर केले. सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर दुपारी ३:५० वाजता तहसीलदार श्री. थोरात यांनी सभेचे कामकाज संपल्याचे जाहीर करून नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले.
या सभेसाठी उपमुख्याधिकारी श्री. संजय मिसर, सभा अधीक्षक श्री. संजय ढमाळ, श्री. अनिल चौधरी आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. निवडीनंतर नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या