भुसावळात श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
नगरसेवक बबलू बरहाटे यांचा पुढाकार; प्रभाग क्र. ११ मधील नागरिकांना मिळणार मोफत उपचार
भुसावळ: संदिप पाटील
श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून, प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांच्या आरोग्यासाठी नगरसेवक तथा गटनेते बबलू सुरेश बरहाटे यांच्या वतीने एका विशेष आरोग्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रभागातील गरजू नागरिकांसाठी 'भव्य मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबीर' पार पडणार आहे.
वाढत्या महागाईच्या काळात डोळ्यांचे उपचार आणि शस्त्रक्रिया सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. हीच बाब लक्षात घेऊन, सामाजिक बांधिलकी जपत बबलू बरहाटे यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची सखोल तपासणी केली जाईल, तसेच ज्या रुग्णांना मोतीबिंदूचे निदान होईल, त्यांच्यावर आवश्यक शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येणार आहेत.
शिबिराचा तपशील खालीलप्रमाणे:
- दिनांक: रविवार, ८ फेब्रुवारी २०२६
- वेळ: सकाळी ९.०० वाजल्यापासून
- स्थळ: राम मंदिर वार्ड, चिरा गल्ली, राठी सरांच्या घराजवळ, भुसावळ.
आयोजक:
श्री. बबलू सुरेश बरहाटे (गटनेते व नगरसेवक, न.पा. भुसावळ)
आवाहन:
प्रभाग क्रमांक ११ मधील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक बबलू बरहाटे आणि मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणी किंवा अधिक माहितीसाठी स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा.
0 टिप्पण्या