ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावरील हल्ला: विठ्ठलवाडी पोलिसांकडून दोन हल्लेखोरांना बेड्या​मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान; निर्भीड पत्रकारितेचा लढा सुरूच ठेवणार - दिलीप मालवणकर यांचा निर्धार

Advertisement

ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावरील हल्ला: विठ्ठलवाडी पोलिसांकडून दोन हल्लेखोरांना बेड्या​मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान; निर्भीड पत्रकारितेचा लढा सुरूच ठेवणार - दिलीप मालवणकर यांचा निर्धार

ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावरील हल्ला: विठ्ठलवाडी पोलिसांकडून दोन हल्लेखोरांना बेड्या ​मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान; निर्भीड पत्रकारितेचा लढा सुरूच ठेवणार - दिलीप मालवणकर यांचा निर्धार

​उल्हासनगर: पोलीसराज मिडिया

गेल्या ५ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अत्यंत क्लिष्ट तपास करून पोलिसांनी दोन सराईत हल्लेखोरांना अटक केली असून, विठ्ठलवाडी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
​तपासाचे आव्हान आणि पोलिसांचे यश.
​५ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता तीन अज्ञात हल्लेखोरांनी विठ्ठलवाडी परिसरात मालवणकर यांना अडवून बेदम मारहाण केली होती. हल्लेखोर विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून आले होते आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. मात्र, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून दोन आरोपींना जेरबंद केले.
​राजकीय सूत्रधाराचा संशय
​या अटकेनंतर दिलीप मालवणकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, "हा हल्ला माझ्या निर्भीड पत्रकारितेमुळे दुखावलेल्या स्थानिक राजकारण्यांनी घडवून आणला आहे. अटक केलेले आरोपी हे केवळ 'सुपारीबाज' असून खरा सूत्रधार कल्याण लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील असण्याची दाट शक्यता आहे." राजकीय वजन वापरून सूत्रधाराला वाचवण्याचे प्रयत्न होऊ शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
​हल्ल्याचा तपशील आणि दुखापत
​या जीवघेण्या हल्ल्यात मालवणकर यांच्या डाव्या खांद्याला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाले असून त्यांच्या हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत. तसेच, मारहाणीदरम्यान त्यांचे ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेटही गहाळ झाले आहे. डॉक्टरांनी त्यांना दोन महिने विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
​पत्रकारितेचे मिशन थांबणार नाही
​हल्ल्यानंतरही मालवणकर यांचा निर्धार कायम आहे. त्यांनी ठणकावून सांगितले की,
​"हल्लेखोरांनी माझा लिहिता हात शाबूत ठेवला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार! आजकालचे राजकारणी असहिष्णू झाले असून त्यांना केवळ स्तुती हवी आहे. पण मी अनिष्ट प्रवृत्तींविरुद्धचा लढा आणि माझी निष्पक्ष पत्रकारिता थांबवणार नाही."

​यावेळी त्यांनी काही मौन बाळगणाऱ्या पत्रकारांवरही टीका केली. एका ज्येष्ठ पत्रकारावर हल्ला होऊनही काही माध्यमांनी सोयीस्कररीत्या घेतलेली गप्प बसण्याची भूमिका दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.
​आता या प्रकरणातील तिसऱ्या फरार आरोपीचा शोध घेणे आणि या हल्ल्यामागचा 'मास्टरमाइंड' कोण आहे, हे उघड करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
​बातमी संकलन: जगदीश का. काशिकर (मुक्त पत्रकार, मुंबई)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या