'पोलीसराज मीडिया'ने उठवताच आवाज, भुसावळ प्रशासन आले रॅडारवर; 'खटिया टाको' आंदोलनाच्या इशाऱ्याने यंत्रणा झाली जागी!
दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्रद्धा नगरमधील अतिक्रमण प्रश्नावर उपविभागीय अधिकाऱ्यांचे थेट कारवाईचे आदेश.
भुसावळ (प्रतिनिधी):पोलीसराज मिडिया
सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात सदैव अग्रेसर असलेल्या 'पोलीसराज मीडिया' च्या बातमीचा मोठा परिणाम दिसून आला आहे. भुसावळ येथील श्रद्धा नगरमधील वाढत्या अतिक्रमणाबाबत आणि रहिवाशांच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी दिलेल्या 'खटिया टाको' आंदोलनाच्या इशाऱ्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. बातमी प्रसिद्ध होताच अवघ्या २४ तासांच्या आत प्रशासकीय चक्रे फिरली असून, उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांना कारवाईचे लेखी आदेश काढले आहेत.
🚩 काय आहे प्रशासनाचा आदेश?
प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी २०/०२/२०२६ रोजी ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर तातडीने संज्ञान घेत उपविभागीय अधिकारी (प्रांत कार्यालय), भुसावळ यांनी खालीलप्रमाणे कडक आदेश दिले आहेत:१. तहसीलदार (भुसावळ) आणि मुख्याधिकारी (नगरपरिषद) यांनी तातडीने प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करावे.
२. संबंधित जागेवर होत असलेल्या अतिक्रमणाबाबत योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी.
३. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सत्वर उपविभागीय कार्यालयात सादर करावा.
पोलीसराज मीडियाचा पाठपुरावा ठरला निर्णायक!
गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या विषयावर प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते. मात्र, या दिरंगाईमुळे प्रमोद पाटील यांच्या परिवाराला प्रचंड मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले, त्यांचे शरीर आजारपणाने त्रस्त झाले. या त्रासाला कंटाळून पाटील यांनी प्रशासनाला 'खटिया टाको' आंदोलनाचा इशारा दिला होता.
यापूर्वी त्यांनी जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर लोकशाही पद्धतीने शांततेत आंदोलन केले होते, मात्र त्यावेळी प्रशासनाने दिलेले पत्र समाधानकारक नव्हते. प्रशासन केवळ 'कासवगतीने' कारवाई करत असल्याचा आरोप पाटील यांनी पोलीसराज मीडियाशी बोलताना केला होता. मीडियाने हा विषय लावून धरताच आणि प्रशासनाचे वाभाडे काढताच, आज तहसीलदार आणि नगरपालिकेला प्रत्यक्ष मैदानात उतरण्याचे आदेश मिळाले आहेत.
"आता केवळ आदेश नको, तर प्रत्यक्ष कारवाई हवी!"
प्रशासनाने आदेश काढले असले तरी, तक्रारदार प्रमोद जगन्नाथ पाटील आणि स्थानिक रहिवासी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. ओपन स्पेसवरील अतिक्रमण आणि माऊली प्लाझा ५५/५६ नोटीस यावरील पुढील प्रत्यक्ष कारवाई जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. केवळ कागदोपत्री घोडे न नाचवता प्रत्यक्ष जागेवर जेसीबी चालवून अतिक्रमण मुक्त करावे, अशी रहिवाशांची मागणी आहे.
🎙️ प्रतिक्रिया:
"मी पोलीसराज मीडियाचा अत्यंत आभारी आहे. दोन वर्षांपासून जो प्रश्न प्रशासकीय फायलींमध्ये रेंगाळला होता, तो मीडियाच्या एका बातमीमुळे निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. आता प्रशासनाने केवळ कागदोपत्री आदेशाचा खेळ न खेळता प्रत्यक्ष जागेवरील अतिक्रमण हटवून आम्हाला न्याय द्यावा, हीच आमची मागणी आहे."
— श्री. प्रमोद जगन्नाथ पाटील (तक्रारदार)
🚩 न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील! पोलीसराज मीडिया - सामान्यांचा बुलंद आवाज! 🚩
0 टिप्पण्या