चोपडा (प्रतिनिधी): संदीप पाटील
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी येथे श्री समर्थ सद्गुरु सुखनाथ बाबा यांचा ९१ वा पुण्यतिथी (भंडारा) सोहळा मंगळवार, दिनांक ३ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन वर्डी दरबार येथे करण्यात आले आहे.
वर्डी दरबारचे मठाधिपती श्री. दीनानाथ महाराज (भैय्यादादा) यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार असून, यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
दिवसभराचे नियोजित कार्यक्रम:
पुण्यतिथीनिमित्त सकाळी ७ वाजेपासून धार्मिक विधींना सुरुवात होईल. कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे:
• सकाळी ७:०० वा. - मंगल आरती
• सकाळी ८:०० वा. - मारुती अभिषेक
• सकाळी ९:०० वा. - समाधी अभिषेक
• सकाळी १०:०० वा. - समाधी पंचामृत स्नान
• सकाळी ११:०० वा. - होम हवन
• दुपारी १२:०० वा. - महाआरती
• सायंकाळी ७:०० वा. - संध्या आरती
• रात्री ८:०० वा. - भव्य पालखी मिरवणूक
• रात्री ९:०० वा. - भजन, कीर्तन व भारुडाचा कार्यक्रम
• रात्री १२:०० वा. - सांगता आरती
या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील समस्त भाविक भक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मठाधिपती श्री. दीनानाथ महाराज आणि वर्डी येथील समस्त ग्रामस्थांनी केले आहे.
0 टिप्पण्या