कृषी विभाग ट्रेसर्स असोसिएशनच्या राज्य अध्यक्षपदी व्यंकटेश हालिंगे; सरचिटणीस पदी सिद्धार्थ पवार यांची निवड
परभणी येथे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन उत्साहात; राज्य कार्यकारिणीची घोषणा
परभणी प्रतिनीधी -
कृषी विभागाच्या 'ट्रेसर्स असोसिएशन' (मृद संधारण) महाराष्ट्र राज्य संघटनेचे १२ वे सुवर्ण महोत्सवी राज्य अधिवेशन परभणी येथे संपन्न झाले. या अधिवेशनात राज्याच्या केंद्रीय कार्यकारिणीची बिनविरोध आणि एकमताने निवड करण्यात आली असून, राज्य अध्यक्षपदी लातूर विभागाचे व्यंकटेश हालिंगे यांची निवड झाली आहे. तर सरचिटणीस पदी ठाणे विभागाचे सिद्धार्थ पवार आणि कोषाध्यक्ष पदी नाशिक विभागाचे यशवंत जडे यांची वर्णी लागली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲड. चंदूलाल सदाशिव शहा यांनी या नूतन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली.
राज्य उपाध्यक्ष व विभागीय सचिव खालीलप्रमाणे:
राज्यातील आठही विभागांतून निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून उपाध्यक्ष आणि सचिवांची निवड करण्यात आली आहे:
राज्य उपाध्यक्ष (विभागांनुसार):
- लातूर: नंदकुमार परांडकर
- कोल्हापूर: श्यामराव जोशी
- नागपूर: राजेंद्र ठाकरे
- अमरावती: अनिल खंडारे
- पुणे: गजानन शेलार
- छत्रपती संभाजीनगर: विलास मनोहरराव निगवेकर
- महिला प्रतिनिधी: जयश्री साळवी भिसे
विभागीय सचिव (विभागांनुसार):
- लातूर: प्रमोद रावके
- कोल्हापूर: बाळासाहेब ठोंबरे
- नागपूर: अभय चिखले
- अमरावती: राजेश बनचरे
- पुणे: सौ. वैशाली साबळे
- नाशिक: वाय. डी. चव्हाण
- ठाणे: सुनील नेतकर
- छत्रपती संभाजीनगर: पद्माकर महामुनी
ॲड. सी. एस. शहा यांची तहहयात सल्लागार पदी निवड
संघटनेच्या कायदेशीर अडीअडचणी सोडवण्यासाठी धुळे येथील अनुरेखक ॲड. सी. एस. शहा यांची 'तहहयात कायदेशीर सल्लागार' म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
अभिनंदनाचा वर्षाव
नवनियुक्त अध्यक्ष व्यंकटेश हालिंगे यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे शाल, पुष्पहार आणि स्मृतीचिन्ह देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या निवडीबद्दल माजी अध्यक्ष अंबादास क्षीरसागर, जयप्रकाश कामडी, प्रकाश कडू, किरण पाटील, आर. आर. बनपुरे, विलास पोवार यांसह राज्यातील अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. संपूर्ण राज्यातून या निवडीचे स्वागत होत असून अनुरेखक संवर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
0 टिप्पण्या