चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार

Advertisement

चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार

चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार

चोपडा (प्रतिनिधी): संदीप पाटील

शिक्षणाच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या चोपडा येथील सी.बी.एस.ई. संलग्न पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलने राष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेतली आहे. केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाची (NEP-2020) प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल शाळेला CED फाउंडेशनतर्फे प्रतिष्ठित 'राष्ट्रीय पंचतारांकित पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.
​नवी दिल्ली येथे पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे केवळ चोपड्याचेच नव्हे, तर जिल्ह्याच्या शैक्षणिक लौकिकात भर पडली आहे.

दिग्गजांच्या उपस्थितीत गौरव
​नवी दिल्लीतील एका विशेष समारंभात भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या NIOS चे उपसंचालक आलोक कुमार गुप्ता, नोएडा फिल्म सिटीचे संस्थापक डॉ. संदीप मारवा आणि प्रियदर्शी नायक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधी सौ. दिपाली पंकज बोरोले व शाळेचे प्राचार्य मिलिंद पाटील यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.
२९ हजार शाळांमधून निवड
​या पुरस्कारासाठीची निवड प्रक्रिया अत्यंत कठीण आणि काटेकोर होती. देशभरातील सुमारे २९ हजार सीबीएसई शाळांमधून मोजक्याच शाळांची निवड करण्यात आली, त्यात पंकज ग्लोबल स्कूलने बाजी मारली. शाळेने राबविलेली विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या निवडीचे मुख्य आधार ठरले.
पुरस्काराची प्रमुख वैशिष्ट्ये:
• ​NEP-2020 अंमलबजावणी: नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची मांडणी.
• ​आधुनिक तंत्रज्ञान: शाळेत कार्यान्वित असलेले AI Learning
(कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण).

• ​वैज्ञानिक दृष्टिकोन: अत्याधुनिक Space Lab आणि Robotics Lab च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी.
• ​नाविन्यपूर्ण उपक्रम: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविले जाणारे कल्पक उपक्रम.
चोहोबाजूने कौतुकाचा वर्षाव
​या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश पंडित बोरोले, अध्यक्ष पंकज बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक नारायण बोरोले, गोकुळ भोळे, प्राचार्य मिलिंद पाटील व सर्व शिक्षकवृंदाचे अभिनंदन करण्यात येत आहे. पालकांनी व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी शाळेच्या या यशाचे जोरदार स्वागत केले असून, चोपड्याचे नाव राष्ट्रीय नकाशावर चमकल्याची भावना व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या