भुसावळमध्ये खळबळ: माऊली प्लाझातील तो 'संशयास्पद' भाडेकरू फरार; बिल्डरच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

Advertisement

भुसावळमध्ये खळबळ: माऊली प्लाझातील तो 'संशयास्पद' भाडेकरू फरार; बिल्डरच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

भुसावळमध्ये खळबळ: माऊली प्लाझातील तो 'संशयास्पद' भाडेकरू फरार; बिल्डरच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

​भुसावळ (प्रतिनिधी): शहरांमधील अपार्टमेंटमध्ये विना ओळखीचे भाडेकरू ठेवणे किती धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय भुसावळमधील 'माऊली प्लाझा' अपार्टमेंटमध्ये आला आहे. येथील
 एक भाडेकरू महिनाभरापासून घराला कुलूप लावून संशयास्पदरीत्या फरार झाला असून, त्याने अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी जागरूक नागरिक प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला लेखी तक्रार देऊन सखोल चौकशीची मागणी केली आहे.

​नेमके प्रकरण काय?
​जामनेर रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळील 'माऊली प्लाझा' अपार्टमेंटमध्ये गेल्या दीड वर्षांपासून एक इसम भाड्याने राहत होता. प्राप्त माहितीनुसार, संबंधित बिल्डरने या भाडेकरूचे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर कोणतेही अधिकृत ओळखपत्र न घेताच त्याला सदनिका भाड्याने दिली होती. तसेच पोलीस स्टेशनला आवश्यक असणारी 'भाडेकरू माहिती' (Tenant Verification) देखील दिली नसल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे.

​आर्थिक फसवणूक आणि सीसीटीव्ही पुरावे
​सदर फरार भाडेकरूने भुसावळमधील अनेक लोकांची, विशेषतः महिलांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचे बोलले जात आहे. तक्रारदार प्रमोद पाटील यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या संदर्भातील काही महिलांचे संभाषण आणि त्या इसमाच्या २३ तारखेच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्या आहेत. हा सर्व डेटा पेनड्राईव्ह स्वरूपात पोलिसांना पुराव्यादाखल देण्याची तयारी तक्रारदाराने दर्शवली आहे.
​जीवितास धोका आणि कट रचल्याचा आरोप
​प्रमोद पाटील यांनी यापूर्वी अपार्टमेंटमधील ओपन स्पेस संदर्भात तक्रारी केल्या होत्या. त्या रागातून बिल्डर, त्याची मुले आणि 'जिघनेश' नामक व्यक्तीसह ४-५ अनोळखी इसमांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात आधीच NC दाखल आहे. "ओळखीचे पुरावे न घेता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला आश्रय देणे, हा माझ्या कुटुंबाविरुद्ध रचलेला कट असू शकतो," असा गंभीर आरोप पाटील यांनी अर्जात केला आहे.
​कायद्याचा बडगा उगारण्याची मागणी
​सरकारी आदेशानुसार भाडेकरूची माहिती पोलिसांना न देणे हा कलम १८८ (IPC) नुसार गुन्हा आहे. तरीही नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या बिल्डरवर आणि त्या फरार इसमावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अर्जाद्वारे करण्यात आली आहे.

​"माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सर्व सदयस ला जीवितास काहीही धोका निर्माण झाल्यास त्याला संबंधित बिल्डर व समधित माऊली प्लाझा प्रकारणातील दोषी अधिकारी तसेच ताबट अड़नाव आहे पूर्ण नाव माहित नाही व त्याचे  4  ते 5 साथीदार जबाबदार असतील."
— प्रमोद जगन्नाथ पाटील (तक्रारदार)

​आता बाजारपेठ पोलीस या प्रकरणातील 'त्या' संशयास्पद भाडेकरूचा शोध घेऊन बिल्डरवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या